Loading...

हा Auto रिक्शा ड्रायव्हर आहे जॉन अब्राहमचा खास मित्र; म्हणाला, वाटले नव्हते जॉन इतका मोठा स्टार होईल

जॉनच्या कलेक्शनमध्ये राजपुताना लाइट फुट, डुकाती डिवेल, कावासाकी निन्जा, सुझुकी हायाबुसा, महिंद्रा मोजोचा समावेश आहे.

Divya Marathi Aug 12, 2018, 12:35 IST

मुंबई - जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' चित्रपट 15 ऑगस्टला रिलीझ होत आहे. रिलीझिंगपूर्वी तो चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी ऑटो रिक्शाने पोहोचला. साधेपणा पसंत करणाऱ्या जॉनचे या ऑटोरिक्शात बसून उपस्थित फोटोग्राफर्सकडून आपले फोटोशूट करून घेतले. प्रत्यक्षात तो ज्या ऑटो रिक्शामध्ये बसून स्क्रीनिंगला आला, त्याचा ड्रायव्हर जॉनचा खास मित्र आहे. सुकू कुमार सूरज आणि जॉनचे खास कनेक्शन आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सुकू जॉनचा आवडता ऑटोरिक्शा ड्रायव्हर आहे. जॉन आणि सुकू एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतात. सुकू म्हणतो, की जॉन कॉलेजमध्ये माझा सीनियर होता. मी कित्येकवेळा जॉनला कॅन्टीनमध्ये पाहिले होते. परंतु, विचारही केला नव्हता की तो इतका मोठा स्टार होईल." 

 

लाखोंच्या बाइक करोडोंच्या कारचा शौकीन आहे जॉन...
- जॉन अब्राहम काही दिवसांपूर्वीच आपली आवडती बाइक यामाहा व्हीमॅक्सवर राइड घेताना दिसून आला होता. त्या बाइकची किंमत 26 लाख 94 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. जॉनला बाइकवर पाहण्याची ही पहिली वेळ नाही. तो बाइकचा वेडा आहे.
- जॉनच्या बाइक कलेक्शनमध्ये राजपुताना लाइट फुट, डुकाती डिवेल, कावासाकी निन्जा, सुझुकी हायाबुसा, महिंद्रा मोजो इत्यादींचा समावेश आहे. एवढेच नव्हे, तर जॉनकडे निसान जीटी-आर (2 कोटी रुपये) आणि लॅम्बॉर्गिनी गॅलार्डो (3.46 कोटी रुपये) या कारचेही कलेक्शन आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, जॉन अब्राहमचे बाइक आणि कार कलेक्शन...


Loading...

Recommended


Loading...