Loading...

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा परिसरात चकमक, जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीच्या हंदवाडा परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दुसरीकडे, श्रीनगरच्या बाबाडेम्ब परिसरात

Divya Marathi Sep 11, 2018, 08:01 IST

श्रीनगर- काश्मीच्या हंदवाडा परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दुसरीकडे, श्रीनगरच्या बाबाडेम्ब परिसरात दहशतवाद्यांनी सोमवारी एका व्यक्तिची गोळी मारून हत्या केली. मृत व्यक्तिचे नाव अब्दुल गनी असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

श्रीनगर पोलिसांनी सांगितले की, गनी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. गनीला दहशतवाद्यांनी गोळी मारली तेव्हा तो आपल्या कारमधून जात होता. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. 


तीन दिवसांपूर्वी देखील एक व्यक्तिची हत्या...
पोलिसांनी सांगितले की, या हल्ल्यात किती दहशतवादी सहभागी होते त्याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. या पूर्वी 8 ऑगस्टला सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी हकीम उर रहमान सुल्तानी नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्यातील एका पोलिस नाक्यावर देखील हल्ला केला होता. या हल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला होता. प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी हल्ला हानून पाडला होता आणि एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.


Loading...

Recommended


Loading...