Loading...

US Open: ओसाका यूएस ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली जपानी महिला; सेरेनाने रॅकेट आपटला, अंपायरवर लावले आरोप

ओसाकाने यूएस ओपनच्या फायनलमध्ये 6 वेळा चॅम्पियन राहिलेली अमेरिकेची स्टार टेनिस प्लेअर सेरेना विल्यम्सला पराभूत केले.

Divya Marathi Sep 09, 2018, 11:36 IST

न्यूयॉर्क - जपानच्या नाओमी ओसाकाने यूएस ओपनच्या फायनलमध्ये 6 वेळा चॅम्पियन राहिलेली अमेरिकेची स्टार टेनिस प्लेअर सेरेना विल्यम्सला पराभूत केले. या विजयासह ओसाका ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली जपानी महिला ठरली आहे. तिने सेरेनाला सरळ सेट्समध्ये 6-2 आणि 6-4 ने हरवले आहे. ओसाकाने पहिला सेट सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाने परतण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी उपस्थित तिच्या कोचवर कथितरित्या हातवारे केल्या प्रकरणी एका गेमचा दंड लागला. चेअर अंपायरने घेतलेल्या या निर्णयास सेरेनाने विरोध केला आणि रागात आपले रॅकेट आपटले. यानंतर तिने माफी देखील मागितली. 


सेरेना अंपायरला रागात म्हणाली चोर...
सेरेना रागात केवळ टेनिस रॅकेट आपटले नाही, तर कथितरित्या अंपायरला चोर देखील म्हटले आहे. परंतु, सेरेनाने आपल्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले. ती म्हणाली, "मी आपली माफी मागते. मी कधीच चीट केले नाही. मला एक मुलगी आहे आणि मी तिच्यासमोर एक आदर्श प्रस्तुत करू इच्छिते. चीट करण्यापेक्षा मी पराभूत होणे पसंत करेन."


सेरेनासोबत फायनलमध्ये खेळणेच स्वप्न होते -ओसाका
ग्रँडस्लॅमचा खिताब जिंकणारी ओसाका म्हणाली, "येथे सगळेच सेरेनाचे समर्थक आहेत. लोक तिलाच चिअर करतील याची मला जाणीव होती. सेरेनाविरुद्ध यूएस ओपनमध्ये खेळणे हेच माझे स्वप्न होते." जिंकल्यानंतर तिने वाकून सेरेनाला धन्यवाद म्हटले आहे.

 


Loading...

Recommended


Loading...