Loading...

विदेशात अवॉर्ड जिंकल्यानंतर ऐश्वर्याने आई-मुलीसोबत शेअर केला Photo, प्रिंसेस लूकमध्ये दिसली आराध्या

ऐश्वर्या रायला अमेरिकेच्या वाशिंग्टनमध्ये मेरिल स्ट्रिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

Divya Marathi Sep 10, 2018, 11:19 IST

मुंबई: ऐश्वर्या रायला अमेरिकेच्या वाशिंग्टनमध्ये मेरिल स्ट्रिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. फिल्म अँड टेलीव्हिजनमध्ये (WIFT)महिलांच्या भूमिकेला जबरदस्त पध्दतीने सिनेमात दाखवण्यासाठी हा अवॉर्ड देण्यात आला. अवॉर्ड मिळाल्यानंतर ऐश्वर्या खुप आनंदी आहे आणि तिने मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये आराध्याही आई ऐश्वर्यासारखी पोज देण्याचा प्रयत्न करतेय. या खास इव्हेंटसाठी ऐश्वर्या अबु जानी आणि संदीप खोसलाच्या डिझाइनर ब्लॅक गाउनमध्ये दिसली. 

 

प्रिंसेस लूकच्या फ्रॉकमध्येमध्ये दिसली आराध्या...
इव्हेंट दरम्यान आराध्याने पिंक कलरचा प्रिंसेस लूक फ्रॉक घातला होता. हा फ्रॉक गुलाबाच्या फुलांनी सजवण्यात आला होता. ऐश्वर्या जिथे जाते तिथे आपली मुलगी आराध्या नेहमी सोबत राहते. यापुर्वीही 2018 मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ती मुलीला घेऊन रॅम्पवर उतरली होती. यावेळी ऐश्वर्या बटरफ्लाय ड्रेसमध्ये होती. तर आराध्याने रेड कलरचा गाऊन घातला होता. यामध्ये ती खुप क्यूट दिसत होती. आई-मुलीचा एक व्हिडिओही समोर आला होता. 


Loading...

Recommended


Loading...