Loading...

इव्हेंटमध्ये अंबानी आणि शाहरुखच्या मुलींनी घातलेल्या ड्रेसवर बिग बींच्या लेक आणि नातीने यापुर्वीच केले आहे फोटोशूट

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाने मुंबईच्या पाली हिलमध्ये आपल्या डिझायनर लेबल MXS लॉन्च केला.

Divya Marathi Sep 05, 2018, 17:04 IST

मुंबई: अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाने मुंबईच्या पाली हिलमध्ये आपल्या डिझायनर लेबल MXS लॉन्च केला. या लॉन्च इव्हेंटमध्ये बॉलिवूड सेलेब्स उपस्थित होते. यामुळे हे खुप चर्चेत राहिले. विशेष म्हणजे महिनाभरापुर्वी श्वेता नंदा आणि नव्या नवेलीने ज्या कपड्यांवर फोटोशूट केले होते. तेच कपडे घालून सेलेब्स येथे पोहोचले. मुकेश आणि नीता अंबानींची मुलगी ईशा येथे श्वेताने घातेला बेल्टचा शाइनी स्कर्ट घालून पोहोचली. 


सुहाना-गौरीने घातला नव्याचा ड्रेस...
फोटोशूट दरम्यान नव्याने डार्क ब्लू टॉप घातला होता. शाहरुखची मुलगी सुहाना खान तसाच टॉप घालून इव्हेंटमध्ये पोहोचली. 
- नव्याने फोटोशूट दरम्यान व्हाइट शाइन पँट घातली होती. शाहरुखची पत्नी गौरी खानने इव्हेंटमध्ये हे रिपीट केले. 
- यासोबतच कतरिना कैफची बहिण इसाबेलही नव्याच्या ब्लॅक अँड व्हाइट स्ट्रिपच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पोहोचली. 
- हे सर्व ड्रेसेस श्वेता नंदाच्या डिझाइन स्टोरचे आहेत. पहिलेच आई आणि लेकीने हे ड्रेस घालून फोटोशूट केले होते. यानंतर सेलेब्सने लॉन्चिंगमध्ये हे खरेदी केले आणि सपोर्टसाठी इव्हेंटमध्ये हे घालून पोहोचले. 


एवढी होती स्टार्सच्या ड्रेसची किंमत
- सेलेब्सच्या फुल सपोर्टमुळे श्वेताच्या स्टोरचे पुर्ण कलेक्शन अवघ्या 2 तासात विकले गेले. याची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून दिली. 
- इव्हेंटमध्ये श्वेता नंदाची मुलगी नव्या नवेली आपल्या ग्लॅमरस लूकमध्ये सर्वात जास्त चर्चेत होती. ती ब्लश मिनी ड्रेस घालून इव्हेंटमध्ये पोहोचली. तिच्या ड्रेसची किंमत 49,999 रु. आहे. 
- तर ईशा अंबानीचा पिंक पाल्म स्कर्टची किंमत, 29,999 रु. होती. तर सुहानाच्या  GALILEO टॉपची किंमत 34,999 रु. आणि कतरिनाची बहीण इसाबेलच्या BRETTON MINI DRESS ची किंमत 29,999 रु. होती.

 


Loading...

Recommended


Loading...