Loading...

IPS ची आत्महत्या : डॉक्टर पत्नीला पाहायचा होता पतीचा मृतदेह, थरथर कापत फक्त म्हणत होती.. मला सोडा..मला सोडा..

2014 बॅचचे आयपीएस सुरेंद्र दास यांनी मागच्या बुधवारी सकाळी 4 वाजता विष प्राशन केले होते. त्यांचे दोन्ही मोबाइलही फुटलेले

Divya Marathi Sep 11, 2018, 00:00 IST

लखनऊ - आत्महत्या केलेले आयपीएस सुरेंद्र यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आला. मोठा भाऊ नरेंद्र दास यांनी त्यांना मुखाग्नी दिला. त्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी पार्थिव पोहोचले तेव्हा त्याठिकाणी सर्वांचेच डोळे पाणावलेले होते. डॉक्टर पत्नी रवीना अंत्यदर्शनासाठी पोहोचताच पतीचा मृतदेह पाहून त्या थरथर कापू लागल्या. वारंवार त्या फक्त मला सोडा.. मला सोडा.. एवढंच बोलत होत्या. सुरेंद्र यांच्या कुटुंबाच्या मते पत्नी रवीना याच सुरेंद्र यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत आहेत. 

 

सुसाइड नोटमध्ये लिहिले दु:ख
- 7 ओळींच्या सुसाइड नोटमध्ये सुरेंद्र दास यांनी लिहिले, मी विष प्राशन करण्यात कुणाचाच दोष नाही. दररोजच्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरगुती भांडणांमुळे परेशान होऊन मी हे पाऊल उचलत आहे.
- सोबत सुसाइड नोटमध्ये रविना आय लव्ह यू असेही लिहिलेले आहे. पोलिसांच्या मते, आणखी काही बाबीसुद्धा सुसाइड नोटमध्ये आहेत, परंतु त्या जगजाहीर करता येणार नाहीत.


गत बुधवारी कौटुंबिक वादामुळे खाल्ले होते विष
2014 बॅचचे आयपीएस सुरेंद्र दास यांनी मागच्या बुधवारी सकाळी 4 वाजता विष प्राशन केले होते. त्यांचे दोन्ही मोबाइलही फुटलेले आढळले होते. सोबतच एक सुसाइड नोटही आढळली होती. ती हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवण्यात आली आहे. चौकशीत कळले की, मागच्या एका आठवड्यापासून ते त्रस्त होते. इंटरनेटवर सुसाइड करण्याच्या पद्धती सर्च करत होते. वास्तविक, ते कौटुंबिक भांडणांमुळे परेशान होते. त्यांची पत्नी डॉक्टर आहे. 


हृदय देत नव्हते साथ
रिजेंसी हॉस्पिटलचे सीएमएस राजेश अग्रवाल यांच्या मते, सुरेंद्र दास यांची हृदयक्रिया सकाळपासून व्यवस्थित होत नव्हती. दुपारपर्यंत हृदयाची धडधड सुरू होती, शेवटी दुपारी 12 वाजून 19 मिनिटांनी हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला.


शरीराचे अनेक अवयव झाले निकामी
विषाच्या प्रभावामुळे सुरेंद्र दास यांचा मेंदू, किडनी, लिव्हर डॅमेज झाले होते. डाव्या पायात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. डॉक्टरांच्या पॅनलने शनिवारी त्यांच्या पायाचे ऑपरेशन करून रक्ताच्या गुठळ्या काढून टाकल्या होत्या. यानंतरही त्यांच्या शरीरात रक्ताभिसरण होत नव्हते. रविवारी त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि यानंतर त्यांचा मृत्यू झाला.


Loading...

Recommended


Loading...