Loading...

बर्थडेच्या पूर्वसंध्येला सेल्फी घेण्यासाठी चढला मालगाडीवर; हायटेंशन वायरचा झटका बसताच सोडले प्राण

वाढदिवसाच्या एक दिवस आधीच 20 वर्षीय तरुणाचा हायटेंशन वायरचा झटका बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Divya Marathi Sep 10, 2018, 14:43 IST

अम्बाला (हरियाणा)- वाढदिवसाच्या एक दिवस आधीच 20 वर्षीय तरुणाचा हायटेंशन वायरचा झटका बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आदित पाठक असे मृत तरुणाचे नाव आहे. आदित सेल्फी घेण्यासाठी कॅंट रेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीवर चढला होता. आदितचे वडील विकास पाठक हे वेटनेरी डॉक्टर आहेत. आदितच्या मित्रांनी घटनेची माहिती देताच नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मुलाच्या मृत्युचे वृत्त समजताच आई बेशुद्ध झाली होती. सोमवारी आदितचा वाढदिवस आहे.

 

हायटेंशन वायरला चिकटका आदित...
रविवारी सायंकाळी आदितच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात आले. आदितच्या वाढदिवसानिमित्त त्याचे तीन मित्र आले होते. त्यांना घेण्यासाठी आदित रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता. या दरम्यान, आदित यार्डमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीवर चढला. तो सेल्फी घेत असताना हायटेंशन वायरला त्याचा हात लागताच तो वायरला चिटकला आणि खाली फेकला गेला.

 

आदितच्या वडीलांनी सांग‍ितले की, तो रविवारी सकाळी गाडी घेऊन घरातून निघाला होता. त्याचा एक मित्रही सोबत होता. आदितने  सांगितले होते की, सहारनपूरहून त्याचे काही मित्र येणार आहेत. त्यांना घेण्यासाठी तो स्टेशनवर जात आहे. मात्र, आश्चर्य याचे वाटते की, आदित मालगाडीवर कसा चढला.

 

10 सप्टेंबरला आदितचा बर्थडे होता..
आदितचा सोमवारी वाढदिवस होता. मागील काही दिवसांपासून तो खूप आनंदी होता. त्याने गेल्या आठवड्यात बर्थडेची शॉपिंगही केली होती.

 

तब्बल सर्वा तासांनी आदितला उतवरले खाली...
मालगाडीवर पडलेला आदितचा मृतदेह खाली उतरविण्यासाठी जीआरपी जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. हायटेंशन वायरमधील विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर आदितचा मृत‍देह खाली उतरवण्यात आला.

 

आदितच्या वडिलांचे एक मित्र लष्करात कर्नल आहे. घटनेची माहिती मिळताच लष्कराचे क्यूआरटी पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने  मालगाडीच्या डब्यावर पडलेला आदितचा मृतदेह खाली उतरवण्यात आला.


Loading...

Recommended


Loading...