Loading...

तुम्हाला माहिती आहे का स्मार्टफोन कसा तयार होतो? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

मार्केटमध्ये दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत आहेत. युनिक डिझाईनसह असे फिचर्स दिले जात आहेत, जे इतर फोनपेक्षा वेगळे आहेत

Divya Marathi Sep 11, 2018, 00:02 IST

मुंबई- मार्केटमध्ये दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत आहेत. युनिक डिझाईनसह असे फिचर्स दिले जात आहेत, जे इतर फोनपेक्षा वेगळे आहेत. प्रत्येक कंपनी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोन कसा तयार होतो याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत.


असा तयार होतो श्याओमी फोन
- स्टिलचा एक तुकडा मशिनखाली ठेवला जातो. त्यातून फोनचा ढाचा तयार होतो. त्याला होलही केले जातात.
- ढाचा तयार झाल्यावर मशिनच्या मदतीने त्याचे फिनिशिंग केले जाते.
- फिनिशिंग झाल्यावर हा ढाचा इतर मशिनमध्ये टाकला जातो. हा पार्ट योग्य पद्धतीने तयार झालाय का हे चेक केले जाते.
- त्यानंतर हा ढाचा टेस्ट केला जातो. फायरच्या मदतीने त्याची क्षमता चेक केली जाते.
- त्यानंतर त्याला लिक्विडमध्ये टाकून पुन्हा चाचणी केली जाते. त्याला आवरण चढवले जाते.
- त्यानंतर त्याची पुढची बाजू तयार केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या मशिन्सची मदत घेतली जाते.
- पाण्याचा वापर करुनही हा फोन चेक केला जातो. त्यासाठी अत्याधुनिक मशिन्स वापरल्या जातात.
- फोनच्या आतल्या हार्डवेअरवर काम केले जाते. त्यावर एक्सपर्टचे लक्ष असते.
- त्यानंतर फोनवर शायनिंग मटेरिअल चढवले जाते. असा फोन तयार होतो.


पुढील स्लाईडवर बघा, कसा तयार होतो स्मार्टफोन...


Loading...

Recommended


Loading...