Loading...

अमरावतीत शिक्षकाने विद्यार्थिनीकडे केली शरीरसुखाची मागणी; पोलखोल होताच आरोपी झाला फरार

जिल्ह्यातील भातकुली येथे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

Divya Marathi Sep 11, 2018, 18:13 IST

अमरावती- जिल्ह्यातील भातकुली येथे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 50 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनेसोबत अश्लील चाळे करत तिला शरीरसुखाची मागणी केली आहे. शोभालाल राठी विद्यालयात हा गंभीर प्रकार घडला. सुरेश ठाकूर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याची पोलखोल झाल्यानंतर तो पसार झाला आहे.

 

विद्यार्थिनीने थेट प्रशासनाकडे केली तक्रार

मागणी पूर्ण केल्यास शाळेतून काढून टाकेन, अशा धमकीला न जुमानता पीडित विद्यार्थिनीने थेट प्रशासनाकडे यांसदर्भात तक्रार केली. मात्र, प्रशासनाने तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने पीडितेने भातकुली पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षकाविरोधात तक्रारी दिली. या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलखोल होताच आरोपी फरार...
भातकुली पोलिस स्टेशनला आरोपी शिक्षकाच्या विरोधात पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. आपली पोल खोल झाल्याचे लक्षात येताच आरोपी सुरेश ठाकूर फरार झाला आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे.

 


Loading...

Recommended


Loading...