Loading...

लाेकशाहीवर विश्वास नाही त्यांना कसे बाेलावणार? राहुल, येचुरींच्या निमंत्रण चर्चेवर संघाचा टाेला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी या नेत्यांना संघाकडून दिल्लीत व्याख्यानमालेचे निमंत्रण देणार असल

Divya Marathi Aug 29, 2018, 06:57 IST

नागपूर- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी या नेत्यांना संघाकडून दिल्लीत व्याख्यानमालेचे निमंत्रण देणार असल्याची चर्चा आहे. मात्र, दुसऱ्यांचे विचार ऐकून किंवा समजून घेणाऱ्या लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही, त्यांना संघाच्या कार्यक्रमात बोलावण्यात काय अर्थ आहे? अशा शब्दांत संघाने या चर्चेच खंडन केले.


संघाचे सरकार्यवाह मनमोहन वैद्य म्हणाले, ‘संघाला निमंत्रणाची खानापूर्ती करावयाची नाही. देशात लोकशाही आहे. त्यात प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांचे विचार ऐकून घेणेही आवश्यक आहे. त्यांना ही लोकशाही मान्यच नसेल तर मग त्यांना निमंत्रण कसे देता येईल?’


पदाधिकारी ठरवतील
राहुल गांधी, येचुरींना आमंत्रण देण्याच्या वादावर वैद्य यांनी टीका केली असली तरी कुणाला बोलावायचे याचा निर्णय शेवटी दिल्लीचे पदाधिकारीच घेतील. निमंत्रितांची यादी तयार करतील, असेही ते म्हणाले. त्यामुळे राहुल किंवा येचुरी यांना निमंत्रण दिले जाण्याची शक्यता कमीच असल्याचे संकेत आहेत.


Loading...

Recommended


Loading...