Loading...

एसआरपीएफ जवानाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी नागपुरातील जयताळा परिसरात घ

Divya Marathi Sep 06, 2018, 07:56 IST

नागपूर- राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी नागपुरातील जयताळा परिसरात घडली. विनोद भगवान घिवंडे (वय २७) असे मृताचे नाव होते. 


जयताळा दाते लेआऊट परिसरातील राहत्या घरीच स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी डोक्यात आरपार गेल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला. घटनेवेळी त्याचे आईवडील व पत्नी घरीच होती. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आठ वर्षांपासून तो एसआरपीएफमध्ये कार्यरत होता. ४ वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 


Loading...

Recommended


Loading...