Loading...

नागपुरात पहिल्यांदाच निघाली पत्नीपीडित पुरूषांची वेदना व्यक्त करणारी भुरी मारबत

संपूर्ण महाराष्ट्रात फक्त नागपुरातच निघणारी मारबतीची मिरवणूक सोमवारी काढण्यात आली.

Divya Marathi Sep 11, 2018, 12:23 IST

नागपूर- महाराष्ट्रात फक्त नागपुरातच निघणारी मारबतीची मिरवणूक सोमवारी काढली. १३७ वर्षांची परंपरा लाभलेली मारबत मिरवणूक नागपूरचे वैशिष्ट्य आहे. तर मारबतीला चालू घडामोडींवर भाष्य करणारे निघणारे बडगे आकर्षणाचे केंद्र होते. यावर्षी पहिल्यांदाच पत्नीपीडित, पुरुषांना खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या महिलांचा निषेध करणारी व पुरुषांचे दु:ख व्यक्त करणारी भुरी मारबत आकर्षणाचे केंद्र होती. 


४९८-अ, घरगुती हिंसाचार, विनयभंग, बलात्कार, घटस्फोट, खावटी, चाईल्ड कस्टडी आदी प्रकरणांत पुरुषांना पोलिस, न्यायालयीन कारवाईत अडकवले जाते. पक्षपाती कायद्यांचा दुरुपयोग करून निर्दोष व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या महिलांचा निषेध म्हणून भुऱ्या मारबतीची मिरवणूक जेंडर इक्वॅलिटी आॅर्गनायझेशनचे सचिव विक्रांत अंभोरे यांच्या पुढाकाराने काढली. 


बाकाबाईच्या निषेधार्थ काळी मारबत

पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीलाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या १३७ वर्षांपासून इतवारी परिसरातील नेहरू पुतळ्यापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढण्यात येते. सुरुवातीला आप्पाजी मराठे काळी मारबतचा उत्सव साजरा करत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांची सत्ता होती. त्यांच्या जुलमी कारवायांमुळे जनता त्रस्त होती. त्यावेळी भोसले घराण्यातील बाकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध म्हणून १८८१ पासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढण्यात येते.


ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. त्यावेळी देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली होती. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. नागपुरात पहिल्यांदाच निघाली पत्नीपीडित पुरूषांची वेदना व्यक्त करणारी भुरी मारबत मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ...

 


Loading...

Recommended


Loading...