Loading...

भाजप कार्यकर्त्यांची नेहा पेंडसेला धक्काबुक्की; सेल्फीसाठी कार्यकर्त्यांकडून हुल्लडबाजी

चिखली येथे मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आले आहे.

Divya Marathi Sep 06, 2018, 09:03 IST

चिखली- चिखलीत भाजपच्या दहीहंडी कार्यक्रमात मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला भाजप कार्यकर्त्यांनी सेल्फी काढण्याच्या नादात धक्काबुक्की केल्याची घटना घडली. आशीर्वाद मेडिकलसमोरील मैदानावर कृष्ण जन्माष्टमीनिमित्त भाजपने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. नेहा स्टेजवर चढत असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तिला सेल्फी काढण्याच्या नादात धक्काबुक्की केली. 


या प्रकारामुळे नेहा प्रचंड संतापली होती. कार्यक्रमस्थळी व्यवस्थित नियाेजन नसल्यामुळे तिला हा त्रास सहन करावा लागला. अायाेजकांनी नेहा पेंडसे हिची माफी मागितली. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीमुळे राग अनावर झाल्याने कोणाचेही न ऐकता नेहा कार्यक्रम स्थळावरून निघून गेली. 


काहीच झाले नाही  : आयोजक 
दरम्यान, याबाबत अायाेजक श्वेताताई महाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी काही घटना घडलीच नसल्याचे सांगितले. उलट नेहा पेंडसे यांनी आमच्या आयोजनाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्याचे त्या म्हणाल्या. आपल्याकडेही कार्यक्रमाची क्लिप असल्याचे त्यांनी नमूद केले.


Loading...

Recommended


Loading...