Loading...

मागासवर्गीय आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात अंतिम अहवाल सादर करणार

मागासवर्ग आयोगाद्वारे प्राप्त होणारा मराठा समाजाच्या मागासपणाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर होईल, अशी माहिती राज्य

Divya Marathi Sep 12, 2018, 06:39 IST

मुंबई- मागासवर्ग आयोगाद्वारे प्राप्त होणारा मराठा समाजाच्या मागासपणाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर होईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. अंतिम अहवाल येईपर्यंत आयोगाच्या अहवालाबाबतचा प्रगती अहवाल दर चार आठवड्यांनी सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. 


मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका अाैरंगाबादचे विनोद पाटील यांनी दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमाेर सुनावणी झाली. यात सामाजिक न्याय विभागातर्फे आयोगाच्या कामाचा प्रगती अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार, मागासवर्ग आयोगाच्या जनसुनावण्यांदरम्यान प्राप्त माहितीचे विश्लेषण पूर्ण झाले असून आयोगाने नेमलेल्या पाच संस्थांनी ४५ हजार मराठा कुटुंबांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निकषांवरील मागासलेपण तपासण्याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय मराठा समाजाची शासकीय नोकऱ्यांमधील आकडेवारीही प्राप्त झाली असल्याचे सरकारने न्यायालयात सांगितले. 

 


Loading...

Recommended


Loading...