Loading...

पंतप्रधान मोदींवर विश्वासघाताचा आरोप; मोबाइल टॉवरवर चढून तरुणाचे शोले स्टाइल आंदोलन

सरकारी नोकरी मिळत नसल्याने सांगलीत मंगळवारी एका तरुणाने शोले स्टाइल आंदोलन केले.

Divya Marathi Sep 12, 2018, 12:33 IST

पुणे- सरकारी नोकरी मिळत नसल्याने सांगलीत मंगळवारी एका तरुणाने शोले स्टाइल आंदोलन केले. तरुणाला टॉवरवरून खाली उतरविण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली. तब्बल तीन तासांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्याला खाली उतरविण्यात आले. तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिल हणमंत कुंभार (35) असे या तरुणाचे नाव आहे.

 

पंतप्रधान मोदींवर विश्वासघाताचा आरोप

अनिल कुंभार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी सांगलीत आले होते. देशातील प्रत्येक तरुणाला रोजगार मिळेल, असे त्यांनी आश्वासन दिले होते. मोदी पंतप्रधान होऊन चार वर्षे उलटले आहेत. मात्र, आपल्याला नोकरी मिळाली नाही, असे अनिलने सांगितले.

 

नरेंद्र मोदींसह राज सरकारवर अनिल कुंभार याने विश्वासघाताचा आरोप केला आहे. पोलिसांनी अनिलला ताब्यात घेतले आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनिल कुंभार यान स्टंट केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


Loading...

Recommended


Loading...