Loading...

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ इको आणि लक्झरी बसचा भीषण अपघात, पाच ठार

मुंबई-गोवा महामार्गावर लांजाजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास इको कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला.

Divya Marathi Sep 11, 2018, 14:55 IST

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास इको कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका चिमुरड्याचा समावेश आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळच्या वाकेडघाटीत हा भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे जाणारी लक्झरी बस आणि गोव्याकडे जाणाऱ्या इको कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, इको कार चक्नाचूर झाली आहे. कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

 

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.  या भीषण अपघातामुळे उपरकर आणि मांजळकर या दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...


Loading...

Recommended


Loading...