Loading...

मंत्री, आमदारांना वेटिंग करायला लावतो हा IAS अधिकारी, 12 वर्षांत 10 वेळा झाली बदली

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवलेले तुकाराम मुंडे हे गरीब व सामान्यांसाठी काम करतात.

Divya Marathi Aug 31, 2018, 12:29 IST

नाशिक- 'माझी बदली करुन नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच बदली करा,' असे नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले आहेत. शिवाय वारंवार बदली केली जाते याचे नक्कीच वाईट वाटते, पण निर्णय शासनाचा असतो, अशी खंतही मुंडे यांनी व्यक्त केली.

 

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवलेले तुकाराम मुंडे हे गरीब व सामान्यांसाठी काम करतात. भारतीय प्रशासन अधिकारी (IAS) तुकाराम मुंढे यांना गेल्यावर्षी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी मुंडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली होती. त्यामुळे मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याआधी तुकाराम मुंढे पुण्यातील पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आपल्या कामाची छाप सोडली होती.


मुंढे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना पोहोचायला हव्यात, अशी त्यांची तळमळ असते. याचे कारण ते स्वत: एक गरीब व सामान्य कुटुंबातून पुढे आहेत. गरिबी काय असते ते त्यांनी लहानपणापासूनच पाहिले, अनुभवले आहे. त्यामुळेच मोठा सरकारी अधिकारी असूनही त्यांचे राहणीमान सामान्यच आहे. ते मनानेही संवेदनशील आहेत.

 

मराठवाड्यासारख्या दुष्काळी व मागास भागात बालपण गेल्याने व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्याने मुंढे यांना 'आहे रे आणि नाही रे' वर्गाची पक्की जाण आहे. त्यामुळेच ते एक कठोर व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पुढे आले.

 

एखाद्या सामान्य व्यक्तीला जी वेळ दिली ते पाळतात मग त्या वेळेत मंत्री, खासदार-आमदार आला तरी त्यांना ताटखळत बसायला लावतात. त्यामुळेच अनेक बडे नेते व लोकप्रतिनिधी तुकाराम मुंढेंबाबत सरकार दरबारी तक्रार करत असतात. एखादा अधिकारी आम्हाला वेटिंग करायला लावतो हेच मूळी बड्या नेत्यांना ढाचते. त्यामुळेच 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मुंढेंची 11 वर्षांत तब्बल 9 वेळा बदली करण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविषयी...


Loading...

Recommended


Loading...