Loading...

भारत बंदमध्ये सहभागी न झालेल्या शिवसेनेचा खरा मुखवटा समोर आला; अशोक चव्हाणांची टीका

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‍काँग्रेसने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रासह देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Divya Marathi Sep 10, 2018, 17:11 IST

मुंबई- इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‍काँग्रेसने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रासह देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेसच्या भारत बंदला 21 पक्षाचा पाठिंबा दिला. ऐनवेळी भारत बंदमध्ये सहभागी न झालेल्या शिवसेनेचा खरा मुखवटा जनते समोर आला असल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण यांनी मोदी सरकारसह शिवसेनेचाही यावेळी समाचार घेतला.

 

भारत बंददरम्यान महाराष्ट्रात कुठेही हिंसक घटना घडली नसल्याने चव्हाण यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. आंदोलनावर सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न परंतु भारत बंदला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महागाईमुळे जनतेत संतापाची लाट पसरली आहे.  इंधन दरवाढीवरून सरकारने हात झटकले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार चालवण्यात अपयशी ठरल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

 

बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिवानी पार्टीसह 21 पक्षांनी पाठिंबा दिला.


Loading...

Recommended


Loading...