Loading...

नगर, धुळे, नंदुरबार महापालिका, ZP निवडणुकांची जबाबदारी गिरीश महाजनांवर, दिला '50+'चा शब्द

निवडणुकांमध्येही आपण पक्षाला ‘फिफ्टी प्लस’ (पन्नास पेक्षा अधिक जागा) शब्द दिला आहे, असे महाजन यांनी शनिवारी सांगितले.

Divya Marathi Aug 25, 2018, 22:53 IST

जळगाव- जळगाव महापालिकेत भाजपला ऐतिहासिक 57 जागांसह एकहाती निर्विवाद सत्ता मिळवून देणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आता पक्षाने धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर येथील आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी सोपवली आहे. या निवडणुकांमध्येही आपण पक्षाला ‘फिफ्टी प्लस’ (पन्नास पेक्षा अधिक जागा) शब्द दिला आहे, असे महाजन यांनी शनिवारी सांगितले.

 

येथील ‘वसंत स्मृती’ कार्यालयात शनिवारी भाजपची बैठक झाली. या वेळी जळगावातील नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना महाजन बोलत होते. जळगाव, जामनेर येथील  निवडणुका जिंकण्याच्या मोहिमांमध्ये धुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आली आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील विजयाचा पॅटर्न धुळ्यात देखील राबविणार असून तेथे देखील ‘फिफ्टी प्लस’चा जिंकण्याचा शब्द पक्षाला दिला असल्याचे महाजन यांनी या वेळी सांगितले.  

 

ते म्हणाले, नाशिक, पालघर, जामनेर नंतर जळगाव महापालिकेत भाजपला यश मिळाले.  जामनेरच्या अनुभवी टीमने जळगावच्या निवडणुकीत मेहनत घेतली. आता धुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ‘जळगाव पॅटर्न’ वापरणार आहे. जळगावातील नगरसेवकांना निवडणुकीचा अनुभव आल्यामुळे आगामी धुळे महापालिका व जि.प. निवडणुकीत जामनेर ऐवजी जळगावातील 200 जणांची टीम  काम करणार आहे. धुळ्यासाेबतच नंदुरबार जिल्हा परिषद आणि अहमदनगर महापालिकेची निवडणूक असल्याने तेथेही लक्ष द्यावे लागणार आहे. ही निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा दावाही महाजन यांनी केला.


Loading...

Recommended


Loading...