Loading...

काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या विरोधात घोषणाबाजी.. 'शरदचंद्रिका'च्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील कर्मचाऱ्याच्या थकीत वेतनासाठी धरणे आंदोलन केले.

Divya Marathi Sep 03, 2018, 20:15 IST

चोपडा- शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील कर्मचाऱ्याच्या थकीत वेतन व इतर प्रलंबित समस्यानी गंभीर स्वरूप धारण केले . या बाबत कर्मचाऱ्यांनी टॅप नॅप संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविला आहे.

 

कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दिले गेलेले वेतन देखील शासकीय नियमानुसार नसून, मनमानी पद्धतीने वेतनात कपात करून, कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने सेल्फचे चेक घेऊन पगारातील काही रक्कम संस्थेचे अकाउंटट सुरेश मयराम पाटील हे संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अड संदीप पाटील, सचिव डॉ स्मिता पाटील व प्राचार्य नरेश शिंदे याच्या आदेशानुसार एचडीएफसी या खासगी बँकेतून काढून घेतात. अशा पद्धतीचा कारभार गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होऊन कर्मचाऱ्यां वर उपासमारीची वेळ आणली आहे. या कर्मचाऱ्यांना खोटे मेमो दिले जात आहेत, बेकायदेशीर बडतर्फी करून मानसिक त्रास दिला जात आहे या मागण्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता चोपडा शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. संस्था अध्यक्ष काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील, प्राचार्य शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

 

'संस्था अध्यक्षांचा धिक्कार असो, अध्यक्ष हाय हाय' अशा घोषणा देऊन
कर्मचार्‍यांनी सहा तास धरणे आंदोलन केले. विविध मागण्यांचे फलक हातात धरून भाषणबाजी करून धरणे आंदोलन केले. यावेळी अनेकांनी पाठिंबा दिला होता. या कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली आहे, या प्रश्नाकडे शासन लक्ष घालून आपल्यला न्याय मिळेल का? अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

 

धरणे आंदोलनात प्रा. जयेश भदाणे, प्रा.सागर साळुंके, प्रा.महेश रावतोळे, प्रा.मनोज पाटील, प्रा.प्रशांत बोरसे, प्रा.राहुल बडगुजर, प्रा.लक्ष्मीकांत पाटील, प्रा.सचिन पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी हिरालाल माळी, ज्ञानेश्वर शंकपाळ, मनोज कासार, उदयकुमार अग्निहोत्री, योगेश महाजन, नरेंद्र विसपुते सहभागी झाले होते.

 


Loading...

Recommended


Loading...