Loading...

इंग्लंडने जिंकली हजारावी कसाेटी; भारताचा मैदानावर सहावा पराभव, 162 धावांत उडाला खुर्दा.

सामनावीर सॅम कुरन अाणि बेन स्टाेक्सच्या अव्वल गाेलंदाजीच्या बळावर यजमान इंग्लंड संघाने अापल्या एेतिहासिक १ हजाराव्या कसा

Divya Marathi Aug 23, 2018, 11:33 IST
भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद केल्यानंतर जल्लोष करताना स्टोक्स.

बर्मिंगहॅम - सामनावीर सॅम कुरन अाणि बेन स्टाेक्सच्या अव्वल गाेलंदाजीच्या बळावर यजमान इंग्लंड संघाने अापल्या एेतिहासिक १ हजाराव्या कसाेटी सामन्यात शानदार विजय संपादन केला. इंग्लंडने एजबेस्टनच्या मैदानावरील सलामीच्या कसाेटी सामन्यात टीम इंडियावर मात केली. यजमान इंग्लंडने ३१ धावांनी कसाेटी सामना जिंकला....


विजयाच्या १९४ धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला झटपट गाशा गुंडाळावा लागला. भारताने दुसऱ्या डावात १६२ धावांपर्यंत मजल मारली. यातून टीमला चाैथ्या दिवशीच लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. संघाच्या विजयासाठी कर्णधार काेहलीने (५१) दिलेली एकाकी झुंज व्यर्थ ठरली. त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. इंग्लंडच्या गाेलंदाजीसमाेर टीम इंडियाच्या विश्वासू फलंदाजांचा फार काळ निभाव लागला नाही.   


अष्टपैलू कामगिरी करणारा युवा खेळाडू सॅम कुरन हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाच्या बळावर यजमान इंग्लंड संघाने पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता ९ अाॅगस्टपासून मालिकेतील दुसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेत अाहे.
खडतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताने शनिवारी ५ बाद ११० धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. विजयासाठी ८४ धावांची गरज असताना भारताकडे पाच विकेट शिल्लक हाेत्या. मात्र, दिनेश कार्तिक सकाळच्या पहिल्या सत्रातील पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर काेहली- हार्दिकने २९ धावांची भागीदारी रचली. काेहलीने  अर्धशतक झळकावले. मात्र, त्याला बेन स्टाेक्सने बाद केले.   

 

कुक बादचा विक्रम; अश्विनचे २०० बळी
 भारताच्या अश्विनने सलामी कसाेटीच्या दाेन्ही डावात यजमान इंग्लंडच्या दिग्गज फलंदाज कुकला बाद केले. यासह कुकला कसोटी क्रिकेटमध्ये सार्वधिक ९ वेळा बाद करणारा अश्विन पहिला खेळाडू ठरला. याशिवाय त्याने अापल्या नावे मोठा विक्रम नाेंदवला. त्याने  विराट कोहलीच्या   नेतृत्वाखाली भारताकडून खेळताना कसोटी सामन्यांमध्ये आपले २०० बळी पूर्ण केले. यासह त्याने या विकमाला गवसणी घातली.

 

सॅम कुरन सामनावीर
इंग्लंडच्या विजयात २० वर्षीय सॅमचे माेलाचे याेगदान ठरले. त्याने अष्टपैलू कामगिरी करताना संघाला विजय मिळवून दिला. त्याने पहिल्या डावात २४ अाणि दुसऱ्या डावात ६३ धावांचे याेगदान दिले. तसेच पाच विकेटही घेतल्या.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, धावफलक...

 

 


Loading...

Recommended


Loading...