Loading...

येथे 'पहिली बायको पळून गेल्यावर दुसरी मिळणार फुकट', लग्नाच्या नावावर सुरू आहे हे काम!

चीनमधील एक मूल धोरणामुळे गावातील तरुणांना चीनच्या तुलनेत व्हिएतनाममधून स्वस्तात नवरी मिळते.

Divya Marathi Sep 07, 2018, 00:07 IST

हटके डेस्क - एकीकडे जगापुढे मोठमोठे प्रश्न आ वासून उभे आहेत, तर दुसरीकडे जगात असेही काही देश आहेत जेथे लिंग गुणोत्तरात मोठ्या प्रमाणावर तफावत येत चालली आहे. 'एक मूल' धोरणामुळे चीनमध्ये लिंग गुणोत्तरात मोठी तफावत आल्याने येथे लग्न करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाहीये.  

 

व्हिएतनाममध्ये मिळते 'स्वस्त' नवरी

चीनमधील एक मूल धोरणामुळे गावातील तरुणांना चीनच्या तुलनेत व्हिएतनाममधून स्वस्तात नवरी मिळते. व्हिएतनामपासून 1700 किमीवर अंतरावरील चीनच्या हेनात डोंगराळ भागातील आसपासची गावे तशी गरीबच, परंतु त्यांची परिस्थितीत व्हिएतनामच्या तुलनेत बरीच चांगली आहे.  येथे व्हिएतनाममधील मुलींशी लग्न केल्यानंतर अनेक अशी प्रकरणे समोर आली जेथे पत्नी आपल्या पतींना सोडून पळून गेल्या. 

 

मॅरेज ब्युरोची जाहिरात - 'पहिली पळून गेल्यावर,  दुसरी फुकट!'
या परिस्थितीत चीनच्या एका मॅरेज ब्यूरोने आपल्या जाहिरातीत हा प्रस्ताव दिला आहे की, बायको पळून गेल्यावर तुम्हाला भरपाई म्हणून कुमारिका तरुणी दिली जाईल. 
मीडिया रिपोर्टनुसार, एक चिनी मॅरेज ब्युरो आकर्षक जाहिरात करत आहे की, जर एखाद्या चिनी पुरुषाने व्हिएतनामी महिलेशी विवाह केला आणि ती पतीला सोडून पळून गेली, तर त्या व्यक्तीचे लग्न पळून गेलेल्या पत्नीच्या बदल्यात दुसऱ्या कुमारिका व्हिएतनामी तरुणीशी मोफत लावले जाईल.

 

लिंग गुणोत्तरात असमानतेचा फटका, भारताची वाटचालही त्या दिशेनेच!

एकूण चीनमध्ये लग्नाचा हा धंदा तेजीत आहे. यामुळे येथे नेहमी अनैतिक पद्धतीनेही लग्न लावल्याच्या घटना समोर येतात. या सर्वांमध्ये काही व्हिएतनामी महिला यामुळे आनंदीसुद्धा आहेत. त्यांच्या मते, लग्नानंतर त्यांचे आयुष्य आणखी सुखकर झाले आहे. कारण आर्थिकदृष्ट्या त्या जरा बऱ्या घरात गेल्या आहेत. परंतु विचार करण्यासारखी बाब म्हणजे, लग्नासाठी मुलींची खरेदी करणे हे कितपत नैतिक आहे. लिंग गुणोत्तर ढासळलेल्या चीनमध्ये हे हाल आहेत, भारताचीही त्या दिशेनेच वाटचाल सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 


Loading...

Recommended


Loading...