Loading...

हैदराबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरण: दोन दहशतवाद्यांना फाशी, एकाला जन्मठेप

हैदराबादेत २००७ मध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात मेट्रोपॉलिटन सेशन कोर्टाचे न्यायाधीश टी. श्रीनिवास राव यांनी स

Divya Marathi Sep 11, 2018, 05:48 IST

हैदराबाद- हैदराबादेत २००७ मध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात मेट्रोपॉलिटन सेशन कोर्टाचे न्यायाधीश टी. श्रीनिवास राव यांनी सोमवारी अनिक शफिक सईद आणि मोहंमद अकबर इस्माईल चौधरी या दोन दहशतवाद्यांना फाशी, तर तारिक अंजुमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तारिकने दहशतवाद्यांना नवी दिल्लीत आश्रय दिला होता. 


या प्रकरणात फारुक शर्फुद्दीन तर्किश आणि मोहंमद सादिक इसरार अहमद शेख या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, तर रियाज भटकळ, त्याचा भाऊ इक्बाल भटकळ आणि आमिर रजा फरार आहेत. कर्नाटकातील भटकळ बंधू पाकिस्तानात पळून गेले आहेत. २५ ऑगस्ट २००७ मध्ये हैदराबादेत झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात ४४ लोकांचा मृत्यू झाला होता व ६८ जण जखमी होते. 


या प्रकरणाचा तपास तेलंगणा पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्सच्या (सीआय) पथकाने केला होता. फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोघांना कोर्टाने प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ऑक्टोबर २००८ मध्ये ४ जणांना अटक केली होती. 


Loading...

Recommended


Loading...