Loading...

हैदराबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन दोषींना आज शिक्षा सुनावणार

२००७ च्या हैदराबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी इंडियन मुजाहिदीनच्या दोघा हस्तकांना महानगर दंडाधिकारी न्यायालय सोम

Divya Marathi Sep 10, 2018, 08:53 IST

हैदराबाद- २००७ च्या हैदराबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी इंडियन मुजाहिदीनच्या दोघा हस्तकांना महानगर दंडाधिकारी न्यायालय सोमवारी शिक्षा सुनावणार आहे. २५ ऑगस्ट २००७ रोजी खुल्या प्रेक्षागृहात झालेल्या शक्तिशाली स्फोटात ४४ ठार तर ६८ जण जखमी झाले होते. 


४ सप्टेंबर रोजी न्यायाधीश टी. श्रीनिवास राव यांनी अनिक शफिक सईद व मोहंमद अकबर इस्माईल चौधरी यांना दोषी ठरवले अाहे. या प्रकरणी फारुक शरफुद्दीन तरकाश व मोहंमद सादिक इसरार अहेमद शेख यांची पुराव्याअभावी सुटका केली. चेरलापल्ली कारागृहात स्थापन केलेले न्यायालय पाचवा आरोपी तारीक अंजुम याला हस्तकांना नवी दिल्लीत व अन्य ठिकाणी थांबवण्यास मदत केल्याच्या आरोपात शिक्षा सुनावणार आहे. सरकारी पक्ष दोषींना मृत्युदंडाच्या शिक्षेची मागणी करेल, असे विशेष सरकारी वकिलाने सांगितले. 


Loading...

Recommended


Loading...