Loading...

एका हातात कापलेले शिर, दुसऱ्या हातात धारदार हत्यार घेऊन पोलिसांत गेला पती, आधी आरामात प्याला पाणी, मग सांगितली क्रौर्याची कहाणी

येथे चिकमंगलूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. पद्धत अशी की सर्वच चकित झाले.

Divya Marathi Sep 12, 2018, 14:45 IST

नॅशनल डेस्क, कर्नाटक - येथे चिकमंगलूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. पद्धत अशी की सर्वच चकित झाले. आरोपी जेव्हा एका थैली घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. त्याच्या एका हातात पांढऱ्या रंगाची थैली होती, तर दुसऱ्या हातात धारदार शस्त्र होते. आरोपीने थैली उघडताच सगळेच दंग झाले, त्यात एका महिलेचे कापलेले शिर होते.

 
पोलिसांनी बनवला व्हिडिओ :
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सतीश आहे. जेव्हा तो पत्नीचे कापलेले शिर घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा पोलिस त्याचा व्हिडिओ शूट करू लागले. सतीशने पोलिसांना सांगितले की, त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याला वाटायचे की, पत्नीचे दुसऱ्यावर प्रेम आहे. यामुळेच त्याने तिची हत्या केली.


'पत्नीवर करायचा जीवापाड प्रेम' : 
ऑटो चालक असलेला सतीश म्हणाला की तो आपली पत्नी रूपावर खूप प्रेम करत होता. तिला ते सर्वकाही दिले, जे देऊ शकत होतो. पण तिने धोका दिला. सतीशने सांगितले की, त्याने आपल्या पत्नीला तिचा प्रियकर सुनीलसोबत पाहिले होते. मी सुनीललासुद्धा मारू इच्छित होतो, परंतु तो वाचला. 
- पोलिसांच्या मते, 9 वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. सतीशने आपल्या पत्नीला सुनीलसोबत एका गार्डनमध्ये पाहिले होते. यानंतर रागात येऊन त्याने पत्नीची हत्या केली. सुनील पळून गेला. पोलिसांनी रूपाचा मृतदेह हस्तगत करून सतीशला अटक केली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा शॉकिंग Video व संबंधित आणखी Photos  

 


Loading...

Recommended


Loading...