Loading...

Recall: रात्री पलंगाखालून पतीला आला आवाज, डोकावल्यावर दिसला पत्नीचा प्रियकर

सुखी वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग उद्भवण्याचे खरे कारण म्हणजे एकमेकांवरील अविश्वास! अशीच प्रकरणे नेहमी उजेडात येतात.

Divya Marathi Aug 10, 2018, 10:12 IST
मन्सूरने त्याची पत्नी फरिदाला प्रियकरासह एका रूममध्ये कोंडले.

कटिहार - सुखी वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग उद्भवण्याचे खरे कारण म्हणजे एकमेकांवरील अविश्वास! अशीच प्रकरणे नेहमी उजेडात येतात. असेच एक प्रकरण गतवर्षी उजेडात अाले होते, ज्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.

 

असे आहे प्रकरण... 

रात्री 2.30 वाजता पत्नीसह पलंगावर झोपलेल्या पतीला खालून काहीतरी आवाज आला. त्याने पलंगाखाली नजर फिरवल्यावर त्याला पत्नीचा प्रियकर लपलेला आढळला. बेडरूममध्ये पत्नीचा प्रियकर पाहून पतीच्या संतापाचा पारा चढला. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला मारहाण सुरू केली. दरम्यान, या गोंधळाच्या आवाजाने शेजारीपाजारी गोळा झाले. पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला एका रूममध्ये बंद केले.

 

5 मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव...
- ही घटना बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील मनिहारी परिसरातील आहे. येथील पटनी बालिया गावात मंगळवार-बुधवारच्या रात्रीदरम्यान घडली. 
- मन्सूर म्हणाला की, 30 वर्षांची माझी पत्नी फरिदा खातून 5 मुलांची आई आहे. मागच्या काही दिवसांपासून फरिदाचे गावातल्या एका तरुणाशी- मोहम्मद मासूमशी प्रेमप्रकरण सुरू होते.
-मन्सूरने अगोदरही त्याच्या पत्नीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते, तेव्हा त्याने पुन्हा अशी चूक न करण्याचा इशारा देऊन सोडून दिले होते. एकदा पकडल्यावरही हे दोघे लपूनछपून भेटत राहिले.


प्रियकराच्या बाहुपाशात होती पत्नी, तेवढ्यात आला पती...
- मन्सूरच्या घरात चार-पाच रूम आहेत. फरिदा आपल्या मुलांना वेगळ्या रूममध्ये झोपवायची आणि स्वत: पतीसह दुसऱ्या रूममध्ये झोपत होती.
- पती आणि घरातील लोकांची नजर चुकवून ती रात्रीच्या अंधारात प्रियकराला बोलवायची. मंगळवारी रात्रीही तसेच झाले.
- फरिदाला भेटायला तिचा प्रियकर तिच्या बेडरूममध्ये घुसला. फरिदा त्याच्या बाहुपाशात होती तेवढ्यात पतीने दार ठोठावले.
- भीतीमुळे फरिदाने त्याला पलंगाखाली लपवले. पतीने बेडरूम आतून बंद केले आणि लाइट बंद करून झोपण्याच्या तयारीत होता. पण त्याला झोप काही येत नव्हती.
- दुसरीकडे, पलंगाखाली लपलेल्या प्रियकराला पळण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, त्याने थोडी चुळबुळ केली, हा आवाज मन्सूरने ऐकला आणि त्याला पकडले.


मारहाणीत फोडले पत्नीचे डोके
- बेडरूममध्ये पत्नी आणि प्रियकराला पकडल्यानंतर पती प्रचंड संतापला. त्याने पत्नी आणि प्रियकराला जबरदस्त मारहाण सुरू केली. 
- बुधवारी सकाळी 9 वाजता मनिहारी पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर मन्सूरने रूमचे लॉक उघडून पत्नी आणि तिच्या प्रियकराला बाहेर काढले. पोलिसांनी दोघांना पकडून सोबत न्यायला लागले, तेव्हा गावकऱ्यांनी याचा विरोध केला.
- गावातील लोकांचे म्हणणे होते की, याप्रकरणी पंचायत बोलावली जावी. गावकऱ्यांच्या विरोधानंतर पोलिसांनी फरिदा आणि तिच्या प्रियकराला गावाचा सरपंच तस्लीम आरिफच्या ताब्यात दिले. घटनेच्या नंतर गावात तणाव आहे. गावात मोठ्या संख्येने पोलिस फोर्स तैनात करण्यात आलेली आहे.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या धक्कादायक घटनेचे आणखी फोटोज...  

 

 


Loading...

Recommended


Loading...