Loading...

100 कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा होता 'HAHK',सेटवर असा असायचा स्टार्सचा अंदाज

'हम आपके है कौन' या म्युझिकल रोमँटिक कॉमेडी सिनेमाच्या रिलीजला 5 ऑगस्ट रोजी 24 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Divya Marathi Aug 07, 2018, 18:50 IST
'हम आपके है कौन'च्या सेटवर दिग्दर्शक सूरज बडजात्या, सलमान खान आणि मोहनिश बहल

एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या 'हम आपके है कौन' या म्युझिकल रोमँटिक कॉमेडी सिनेमाच्या रिलीजला 5 ऑगस्ट रोजी 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने  सिनेमाच्या ऑनलोकेशनची निवडक छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

5 ऑगस्ट 1994 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमात आजचा सुपरस्टार सलमान खान, धक-धक गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली माधुरी दीक्षित, मोहनीश बहल, रेणुका शहाणे आणि आलोकनाथ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमातील गाणी आजही लग्नसमारंभात ऐकायला मिळतात.

 

राजश्री प्रॉडक्शनच्या 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'नदिया के पार' या सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमाने त्याकाळी वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तब्बल 135 कोटींची कमाई केली होती. शंभर कोटींहून अधिकचा व्यवसाय करणारा हा पहिला हिंदी सिनेमा होता.

 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमाच्या ऑनलोकेशनची छायाचित्रे...

 

सर्व फोटोजः साभार राजश्री प्रॉडक्शन


Loading...

Recommended


Loading...