Loading...

सप्टेंबरमध्ये 3 ग्रहांमुळे 6 राशींना होऊ शकतो धनलाभ, इतर राशीच्या लोकांनी राहावे सांभाळून

या महिन्याच्या सुरुवातील शुक्र आणि बुध राशी परिवर्तन करून तूळ आणि सिंह राशीत प्रवेश करतील.

Divya Marathi Sep 05, 2018, 15:29 IST

या महिन्याच्या सुरुवातील शुक्र आणि बुध राशी परिवर्तन करून तूळ आणि सिंह राशीत प्रवेश करतील. बुध राशी परिवर्तनामुळे बुधादित्य योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने 6 राशीच्या लोकांना प्रगती आणि धन लाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त गुरुसोबत शुक्र ग्रह असल्यामुळे सहा राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. यानंतर 6 सप्टेंबरला शनी मार्गी होत असल्यामुळे काही लोक कोर्ट प्रकरणात अडकू शकतात, कर्ज वाढू शकते आणि वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. येथे जाणून घ्या, सप्टेंबरचा महिना कसा राहील तुमच्या राशीसाठी...


मेष 
शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर थोडे सावध राहावे. अन्यथा लाभाऐवजी नुकसान होण्याची शक्यता. स्वप्रयत्नांनी तुमचा व्यवसाय अधिक व्यापक करण्यास समर्थ असाल. जमीन, मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर थोडा काळ थांबावे. त्यामुळे लाभ संभवतो.  


वृषभ
व्यावसायिक स्तरावर सल्ला ऐकण्यासाठी तुमच्या विचारांमध्ये खुलेपणा येईल. परिस्थिती जोखण्याची तुमची क्षमता आर्थिक व्यवहारांत निर्णय घेण्यासाठी सहायक ठरेल. जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतील. त्यांच्याविषयी जाणण्याची संधी मिळेल. तुमचे सर्वांगीण ज्ञान रचनात्मकता प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल


मिथुन
व्यवसायासाठी अति प्रभावशाली कल्पना असतील. तुम्हाला त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या नव्या उद्योगाला गुंतवणूकदारांकडून आर्थिक प्रस्ताव मिळेल. मात्र असे प्रस्ताव न स्वीकारणे योग्य ठरेल. स्वतंत्रपणे काम करणे तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. 


कर्क
उच्च शिक्षण घेत असलेल्यांना यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. स्वविवेकाने घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम देणारे सिद्ध होतील. एखादे कठीण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळेल. तल्लीनतेने कामात व्यग्र राहाल. त्याचे परिणाम आनंददायी असतील.


Loading...

Recommended


Loading...