Loading...

हे घरगुती उपाय केल्यास खोकला होईल छुमंतर

पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे छातीत कफ तयार होतो. त्यामुळे खोकल्याचा त्रास व्हायलला लागतो

Divya Marathi Sep 02, 2018, 16:21 IST

पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे छातीत कफ तयार होतो. त्यामुळे खोकल्याचा त्रास व्हायलला लागतो. उत्तराखंड आयुर्वेदिक विद्यापीठाच्या आरोग्य वृत्त विभागाचे प्रमुख डॉ. अवधेश मिश्रा सांगतात की, साध्या खोकल्यावर अॅलोपॅथिक औषधी घेतल्याने साइड इफेक्ट होऊ शकतात. याऐवजी आयुर्वेदिक औषधी किंवा घरगुती उपाय जास्त फायदेशीर ठरू शकतात. त्यांच्याकडून जाणून घेऊया खोकला मुळापासून नष्ट करण्याचे 8 घरगुती उपाय... 


खोकला दूर करण्याचे खास घरगुरी उपाय 
- जवस आणि तीळ समप्रमाणात मिसळून भाजून घ्या. याची पावडर बनवून सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्यासोबत एक चमचा घ्या. 


- एक कप पाण्यात आल्याचा एक तुकडा, चिमूटभर दालचिनी आणि मिरे टाकून उकळून घ्या. कोमट झाल्यावर गाळून मध मिसळून प्या. 


- लसणाच्या ३-४ पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद एक ग्लास दुधामध्ये टाकून उकळा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. 


- एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून दररोज सकाळी उपाशीपोटी घ्या. 


- एक कप पाण्यात ४-५ लवंग टाकून उकळा. कोमट झाल्यानंतर यात अर्धा लिंबू पिळा व एक चमचा मध मिसळून घ्या. 


- मोहरीच्या तेलामध्ये ४-५ पाकळ्या लसूण टाकून गरम करा. झोपण्यापूर्वी या कोमट तेलाने पायाच्या तळव्यांवर, छातीवर मालिश करा. 


Loading...

Recommended


Loading...