Loading...

हितेंद्र महाजन यांनी १० तास ३४ मिनिटांत पूर्ण केली लेह अल्ट्रा मॅरेथॉन

स्टेट अॅक्रास अमेरिका अर्थात 'रॅम' यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महाजन बंधूंनी यशस्वी कामगिरीत सातत्य कायम ठेवले आहे.

Divya Marathi Sep 08, 2018, 10:06 IST

नाशिक- स्टेट अॅक्रास अमेरिका अर्थात 'रॅम' यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महाजन बंधूंनी यशस्वी कामगिरीत सातत्य कायम ठेवले आहे. हितेंद्र महाजन यांनी जागतिक स्तरावर अत्यंत खडतर समजली जाणारी लेह अल्ट्रा मॅरेथॉन ज्यात १८ हजार फूट उंच पर्वतावर ३५ किलोमीटर धावत जाणे आणि पुन्हा लेह गावात उतरणे या कामगिरीचा समावेश होता. ही स्पर्धा त्यांनी शुक्रवारी १० तास ३४ मिनिटांत पूर्ण केली.

 

६०० किलोमीटर सायकल ब्रेव्ह स्पर्धेला आज प्रारंभ 
सायकलपटूंच्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या ६०० किलोमीटर ब्रेव्ह स्पर्धेला शनिवारपासून (दि. ८ सप्टेंबर) प्रारंभ होणार आहे. ती ४० तासांत पूर्ण करावयाची असते. मुंबईनाका येथून सकाळी ६ वाजता त्यास सुरुवात हाेईल. मुंबई-अाग्रा महामार्गावरून इंदूर व तेथून धुलानिया या गावाहून परत नाशिकला असा या स्पर्धेचा मार्ग असून त्यात २३ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. 


Loading...

Recommended


Loading...