Loading...

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीर होते कमजोर, या आहाराने वाढावा हिमोग्लोबिनचे प्रमाण

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीर खूप कमजोर होते. यामुळे त्वचेमध्ये पिवळेपणा, चक्कर येणे, तंद्री लागणे, कमजोरी आणि थकवा इत

Divya Marathi Sep 04, 2018, 12:37 IST

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीर खूप कमजोर होते. यामुळे त्वचेमध्ये पिवळेपणा, चक्कर येणे, तंद्री लागणे, कमजोरी आणि थकवा इत्यादी प्रकारच्या समस्या होतात. साधारणत: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या समस्या जास्त असतात. कारण महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त लोहाची आवश्यकता असते आणि त्याची पूर्तता सामान्य खाद्यपदार्थ करू शकत नाहीत. जाणून घेऊया ज्यांच्या सेवनाने शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवता येईल अशा आहाराबद्दल... 


मक्याचे दाणे 
मक्याच्या पिठापासून बनलेली भाकर खाल्ल्याने लठ्ठपणा नियंत्रणात राहतो आणि मक्याचे दाणे खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनची पातळीही वाढते. वस्तुत: मक्याचे दाणे खूप पौष्टिक असतात आणि त्यात लोहदेखील भरपूर असते. दाणे उकळून किंवा भाजून खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता राहत नाही. 


बीट 
शरीरातील रक्त वाढवायचे असेल तर सर्वात आधी बीटचे नाव घेतले जाते. हे फळ कच्चे सलाड बनवून किंवा याचा ज्यूस बनवून पिल्याने फायदा होतो. मात्र, वेगाने रक्त वाढवायचे असेल तर याच्या रसात थोडे मध टाकून सेवन करावे. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात लोह मिळते. 


पालक 
रक्ताची कमतरता दूर करण्यामध्ये पालक औषधासारखे काम करते. यात व्हिटॅमिन ए, सी, बी९, लोह, फायबर आणि कॅल्शियम इत्यादी घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरात २० टक्क्यांपर्यंत लोहाचे प्रमाण वाढू शकते. पालकाचे सेवन सूप किंवा भाजी बनवून करता येईल. 


Loading...

Recommended


Loading...