Loading...

वारंवार प्रसारमाध्यमांकडे बाजू मांडणे योग्य नाहीच; HC ने दाभाेलकर-पानसरे कुटुंबीयांना सुनावले

संवेदनशील प्रकरणातील तपासाबाबतची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवण्याऱ्या तपास यंत्रणांची मुंबई उच्च न्यायालयाने

Divya Marathi Sep 07, 2018, 07:08 IST

मुंबई- संवेदनशील प्रकरणातील तपासाबाबतची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवण्याऱ्या तपास यंत्रणांची मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलीच कानउघाडणी केली. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन वारंवार माध्यमांकडे जाणे योग्य नसल्याचेही काेर्टाने डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे कुटुंबीयांना उद्देशून म्हटले. 


दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांद्वारे दाखल केलेल्या याचिकेवर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. गुरुवारी सुनावणीदरम्यान सीबीआय आणि राज्य पोलिसांच्या विशेष तपास पथकाने दाेन्ही हत्याकांडातील आपापले तपासाबाबतचे प्रगती अहवाल न्यायालयात सादर केले. त्या वेळी मत व्यक्त करताना न्यायालयाने तपासातील गोपनीय माहिती नियमितपणे प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. 


'दर दिवशी या संवेदनशील प्रकरणातील काहीतरी खळबळजनक माहिती वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होत अाहे,' हे नमूद करताना न्यायालयाने उर्वरित. पान ८ 


कार्यकर्त्यांची नजरकैद १२ सप्टेंबरपर्यंत वाढवली 
नवी दिल्ली - कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आराेपावरून अटकेत असलेल्या पाच डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांची नजरकैद सुप्रीम कोर्टाने १२ सप्टेंबरपर्यंत वाढवली. याच दिवशी पुढील सुनावणी होईल. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या घटनापीठाने याप्रकरणी पुण्याच्या पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून फटकारले. न्यायालयावर आक्षेप घेण्याचा हा प्रकार असल्याचे कोर्टाने बजावले. 

 


Loading...

Recommended


Loading...