Loading...

उपोषणामुळे हार्दिकचे वजन 20 किलो झाले कमी, उपास न करताही कमी करू शकता वजन

पाटीदार समाजाच्या आरक्षण मागणीसाठी बेमुदत उपोषण करत असलेल्या हार्दिक पटेलचे वजन 20 किलो कमी झाले आहे.

Divya Marathi Sep 05, 2018, 15:04 IST

पाटीदार समाजाच्या आरक्षण मागणीसाठी बेमुदत उपोषण करत असलेल्या हार्दिक पटेलचे वजन 20 किलो कमी झाले आहे. डॉक्टरांनी हार्दिकला उपचाराचा सल्ला दिला आहे. हार्दिक पटेलला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न केल्यास त्याच्या शरीराचे काही अवयव डॅमेजही होऊ शकतात. उपोषणामुळे हार्दिकचे वजन दिवसेंदिवस कमी होत आहे. आज आम्ही तुम्हाला वजन कशामुळे कमी होते आणि दैनंदिन आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते याविषयीची खास माहिती देत आहोत. 


यामुळे वाढते किंवा कमी होते वजन
- निरोगी व्यक्तीचे वजन जेवणाचे प्रमाणात आणि व्यक्तीची सक्रियता, कार्य, मेहनतीनुसार राहते. सामान्यतः व्यक्तीच्या कार्यानुसार त्याची ऊर्जा (कॅलरी)ची मात्रा निर्धारित होते.
- जास्त मेहनत किंवा व्यायाम केल्याने भूक वाढते. शरीराला पर्याप्त कॅलरी मिळत राहिल्यास वजन सामान्य राहते. परंतु सक्रियता आणि कॅलरी यांचे संतुलन बिघडले तर वजन कमी होते किंवा वाढते. शरीराचे 1 पौंड वजन कमी होण्याचा किंवा वाढण्याचा अर्थ शरीरात 3,500 कॅलरीची कमतरता किंवा वाढ झाली आहे.


जाणून घ्या, व्यायाम न करता वजन कमी करण्याचे उपाय 
वाढलेले वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत, ज्यांच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते. तुम्हालाही कमी कष्टामध्ये वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही छोटे-छोटे उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यास तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल.


- जास्त कार्बोहायेड्रेट असणार्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते.


- फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाण्यापेक्षा गहू, सोयाबीन आणि हरभरे मिश्रित पिठाची पोळी फायदेशीर ठरते.


- दररोज पत्ताकोबीचे ज्यूस घ्यावे. पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असतात. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते.


पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, वजन कमी करण्याचे आणखी काही खास अचूक उपाय...

 


Loading...

Recommended


Loading...