Loading...

सबकुछ सॉलिवूड असलेल्या युगांतर लघुपटाचा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरव

सबकुछ सॉलिवूड असलेल्या युगांतर लघुपटाला देशातील वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात गौरवण्यात येत आहे.

Divya Marathi Sep 08, 2018, 10:49 IST

सोलापूर- सबकुछ सॉलिवूड असलेल्या युगांतर लघुपटाला देशातील वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात गौरवण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या पुण्याच्या सिक्स्टी सेकंड आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे. इचलकरंजी येथील लघुपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट संकलन पुरस्कार मिळाला. हैदराबाद आणि पानिपत येथील लघुपट महोत्सवातही यश प्राप्त झाले आहे. 


केवळ सहा मिनिटांचा हा लघुपट असून कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन व छायाचित्रण आनंद शिंगाडे आणि स्वप्निल शिंगाडे यांचे आहे. विशेष म्हणजे पोलिस दलात सेवा करणारे रवी व्हनमारे, नीलेश लंगडेवाले आणि विनायक माढेकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. संकलन आणि चित्रीकरण वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावच्या सागवानी जंगलामध्ये एका फार्महाऊसवर हा लघुपट चित्रित करण्यात आला आहे. तो केरळ, मलबार कोकण किंवा पूर्वांचलच्या एखाद्या भल्यामोठ्या जंगलात चित्रीकरण केल्याप्रमाणे दिसतो. त्यामुळे त्याला वेगळाच लूक आला आहे. डबिंग हॉलिवूडप्रमाणे करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. 


वेगळा विषय सादर करण्याचा प्रयत्न 
एका गरीब शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात आणि यदा यदा ही धर्मस्य या गीतेतील उक्तीवर आधारित आहे. सामाजिक गरिबी, अफवा, तोच तोच विषय न म्हणता रणनीती आणि प्रवृत्ती या विषयावर भाष्य करणारा लघुपट बनविला आहे.
- आनंद शिंगाडे, दिग्दर्शक 


Loading...

Recommended


Loading...