Loading...

राज्यांनी पेट्रोल ३.२० रुपये, डिझेल २.३० रुपयांनी स्वस्त केले तरी सरकार राहील फायद्यात

पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवारी सलग २७ दिवशी १४ पैशांनी वाढले. यामुळे जनता हैराण आहे, तर राज्य सरकारचा आिर्थक फायदा वाढत आहे

Divya Marathi Sep 12, 2018, 06:18 IST

नवी दिल्ली- पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवारी सलग २७ दिवशी १४ पैशांनी वाढले. यामुळे जनता हैराण आहे, तर राज्य सरकारचा आिर्थक फायदा वाढत आहे. एसबीआयच्या एका संशोधन अहवालानुसार, वाढलेल्या दरांमुळे १९ प्रमुख राज्यांना २०१८-१९ मध्ये २२,७०२ कोटी रुपयांची अिधक कमाई होईल. हा अंदाज वर्षभर कच्च्या तेलाचा दर सरासरी ७५ डॉलर प्रति बॅरल आणि डॉलरचे मूल्य ७२ रुपये राहील, असे मानून काढण्यात आला आहे. अहवालानुसार, राज्यात पेट्रोलचे दर सरासरी ३.२० रु. आणि डिझेल २.३० रुपयांनी कमी केले तरीही राज्यांचा महसूल अंदाजपत्रकाइतकाच राहील. राज्ये इंधन दरासोबत डिलर कमिशनवर व्हॅट घेतात. १९ राज्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. या राज्यांत पेट्रोलवर २४ ते ३९% आणि डिझेलवर १७ ते २८% व्हॅट आहे. 


सेन्सेक्समध्ये ५०९ अंकांची घसरण, १० दिवसांत १,४८३ अंकांनी खाली 
रुपयाची घसरण व अमेरिकेत व्यापार युद्ध वाढण्याची शक्यता असल्याने सेन्सेक्समध्ये ५०९ अंकांची घसरण झाली. सहा महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे. २८ ऑगस्टला ३८,८९६ रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्यानंतर १० दिवसांत निर्देशांकात ३.८% घसरण झाली.


रुपया ७२.७४ नीचांकी पातळीवर, ८ महिन्यांत १३ टक्क्यांची घसरण
मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७२.७४ विक्रमी पातळीवर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी डॉलरच्या तुलनेत रुपया २४ पैशांनी घसरून ७२.६९ वर बंद झाला. भारतीय चलनात एप्रिलपासून आतापर्यंत ११.५% तर जानेवारीपासून  १३% घसरण झाली आहे.


मुनगंटीवार म्हणतात...महाराष्ट्रात २८ तारखेपर्यंत कर कपातीचा निर्णय नाही 
मुंबई : कर्नाटक, अांध्र, राजस्थान राज्य सरकारने इंधनावरील करांत कपात केल्याने त्या राज्यांत पेट्राेल-डिझेल काहीसे स्वस्त झाले अाहे. महाराष्ट्रात मात्र तूर्त कर कपात करण्यास राज्य सरकार तयार नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘अाम्ही गेल्या वर्षीच पेट्रोल व डिझेल अनुक्रमे २ व १ रुपयांनी स्वस्त केले. अाता हे इंधन जीएसटीत अाणण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करत अाहाेत. २८ सप्टेंबरच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला तर अापाेअापच पेट्राेलचे दर कमी हाेतील. तसे न झाल्यास राज्य सरकार वेगळा निर्णय घेईल.’


Loading...

Recommended


Loading...