Loading...

अाठ वर्षांनंतर राेइंगमध्ये सुवर्णपदक, बाेपन्ना-दिविज चॅम्पियन; गतविजेत्या भारतीय महिलांना राैप्यपदक

नाशिकच्या राेव्हर दत्तू भाेकनाळने अापल्या अव्वल कामगिरीच्या बळावर भारतीय संघाला राेइंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले.

Divya Marathi Aug 25, 2018, 08:17 IST

जकार्ता- नाशिकच्या राेव्हर दत्तू भाेकनाळने अापल्या अव्वल कामगिरीच्या बळावर भारतीय संघाला राेइंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. यासह भारतीय संघाने तब्बल अाठ वर्षांनंतर १८ व्या एशियन गेम्समध्ये राेंइगच्या सांघिक गटात साेनेरी यशाचा पल्ला गाठला.याशिवाय दुष्यंत कुमार अाणि भगवान-राेहितने राेइंगच्या गटात भारतीय संघाला कांस्यपदक मिळवून दिले. यासह भारताने राेइंगमध्ये एका सुवर्णासह दाेन कांस्यपदकांची कमाई केली. त्यापाठाेपाठ टेनिसपटू राेहन बाेपन्नाने अापला सहकारी दिविज शरणसाेबत पुरुष दुहेरीत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. या जाेडीने पुुरुष दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. 


याशिवाय टेनिसच्या एकेरी गटात युवा खेळाडू प्रजनेश गुणेश्वरने कांस्यपदक पटकावले. तसेच माजी नंबर वन नेमबाज हिना सिद्धूने कांस्यपदक पटकावले. यासह भारताने शुक्रवारी स्पर्धेच्या सातव्या दिवशी एकूण सात पदके जिंकली. यास दाेन सुवर्ण, एक राैप्य अाणि चार कांस्यपदकांचा समावेश अाहे. यासह अाता भारताच्या नावे  २५ पदके झाली. यामध्ये सहा सुवर्ण, ५ राैप्य अाणि १४ कांस्यपदके अाहेत. दरम्यान, बॅडमिंटनमध्ये भारताच्या के.श्रीकांत अाणि प्रणयला एकेरीच्या सलामीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताचे या गटातील पदकाचेही स्वप्न धुळीत मिळाले.


राेइंगमध्ये भारताची २८ वर्षांत दुसरी अव्वल कामगिरी
भारताच्या पुरुष संघाने शुक्रवारी राेइंगच्या क्वाड्रपल इव्हेंटमध्ये (चार खेळाडू) सुवर्णपदक पटकावले. यामध्ये दत्तू भाेकनाळ, स्वर्ण सिंग, सुखमीत सिंग अाणि अाेम प्रकाशने अव्वल कामगिरी करताना भारताला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला. त्यांनी या गटातील २००० मीटरची ही रेस ६ मिनिटे १७.१३ सेकंदांत पूर्ण केली. भारताचा संघ हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. २८ वर्षांत भारताला दुसरी अव्वल कामगिरी करता अाली. यातून टीमला सांघिक गटात अव्वल स्थान गाठता अाले. अाठ वर्षांनंतर भारताने राेइंगमध्ये सुवर्ण जिंकले. २०१० मध्ये बजरंगलालने सिंगलमध्ये सुवर्ण मिळवले हाेते. 


टेनिस : प्रजनेशची झुंज अपयशी; कांस्यपदकाचा ठरला मानकरी
भारताच्या युवा टेनिस स्टार प्रजनेश गुणेश्वरनने पुरुष एकेरीच्या गटात कांस्यपदक पटकावले. त्याला या गटाच्या उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ताे या पदकाचा मानकरी ठरला. त्याला या गटात उझबेकिस्तानच्या डेनिस इस्ताेमिनने पराभूत केले. डेनिसने ६-२, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याला अंतिम फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला. दरम्यान, प्रजनेशला दाेन्ही सेटवर प्रत्युत्तराची संधी मिळाली नाही. यामुळे ताे पराभूत झाला. 


बाेपन्ना-दिविज ५२ मिनिटांत ठरले विजेते  
भारताचा राेहन बाेपन्ना हा दिविज शरणसाेबत शुक्रवारी अवघ्या ५२ मिनिटांत चॅम्पियन ठरला. या जाेडीने पुरुष दुहेरीचा अंतिम सामना जिंकून हा किताब पटकावला. त्यांनी कझाकिस्तानच्या बुबलिक अाणि डेनिस येवसेयेववर मात केली. त्यांनी ६-३, ६-४ ने  विजय संपादन केला. यासह भारताचा बाेपन्ना अाणि दिविज हे दाेघेही सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. या जाेडीचे  हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. भारताचे सांघिक गटातील या स्पर्धेतील हे चाैथे सुवर्णपदक ठरले. 


नेमबाजी : हिनाचे ठरले पहिले वैयक्तिक पदक
भारताची अव्वल नेमबाज हिना सिद्धूने शुक्रवारी महिलांच्या गटात कांस्यपदक पटकावले. तिने १० मीटर पिस्तूल प्रकारामध्ये तिसऱ्या स्थानावर धडक मारली. तिने २१९.२ गुणांची कमाई केली. यामुळे तिला कांस्यपदकाची कमाई करता अाली. याच गटात भारताची १६ वर्षीय मनु भाकर ही पाचव्या स्थानावर राहिली. तिने १७६.२ गुण संपादन केले. यामुळे तिचा पदकाचा प्रयत्न अपुरा ठरला. या गटात चीनच्या वांग कियानने सुवर्णची कमाई केली. तिने २४०.३ विक्रमी गुणांच्या अाधारे हे सुवर्णपदक पटकावले. काेरियाच्या खेळाडूने राैप्य जिंकले. 


कबड्डी : ३ गुणांनी गमावले सुवर्ण; भारताचा पराभव
दाेन वेळच्या चॅम्पियन भारतीय महिला संघाला कबड्डी प्रकारात राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. या संघाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. इराणच्या महिलांनी सरस खेळी करताना भारतीय संघाला धूळ चारली. इराणने २७-२४ ने सामना जिंकला. अवघ्या ३ गुणांच्या पिछाडीमुळे भारतीय संघाला किताबावरचे अापले वर्चस्व गमवावे लागले.  भारताने सलग दाेन वेळा या स्पर्धेचा किताब पटकावला. त्यामुळे यंदाही टीमला सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार मानले जात हाेते. मात्र, यंदा इराणच्या टीमने हे वर्चस्व माेडीत काढले.


स्पर्धेला डाेपिंगचा डंख; पहिले प्रकरण उघडकीस  
डाेपिंग हा क्रीडा विश्वाला लागलेला अभिशाप मानला जाताे. यामुळेच या विश्वाची प्रतिष्ठा धाेक्यात अाली. हाच धाेका यंदाच्या स्पर्धेत टाळण्यासाठी अाशियाई अाॅलिम्पिक महासंघाने (अाेसीए) कंबर कसली अाणि अनेक पुढाकारातून डाेपिंगला अाळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या १८ व्या एशियन गेम्सला अाता डाेपिंगचा डंख लागल्याचे प्रकरण समाेर अाले. यातूनच अाेसीएने पहिली कारवाई केली. तुर्कमेनिस्तानच्या कुस्तीपटू रुस्तम नजाराेवने अवैध असे अाैषध घेतल्याचे समाेर अाले.  त्याला ५७ किलाे वजन गटात अपात्र ठरवण्यात अाले. त्याला १९ अाॅगस्ट राेजी या गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या संदीप ताेमरकडून पराभवाचा सामना करावा  लागला.


दुष्यंतचे सलग दुसरे कांस्यपदक
एकेरी स्कल्समध्ये दुष्यंत कुमार हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने ७ मिनिटे १८.७६सेकंदांत ही रेस पुर्ण केली. यासह ताे तिसऱ्या स्थानावर राहिला. त्याचे एशियन गेम्समधील हे दुसरे पदक ठरले. त्याने यापूर्वी २०१४ इंचियाेनमध्येही कांस्यपदक पटकावले हाेते. त्याची या गटातील कामगिरीही अव्वल ठरली. त्याने अापल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तिसरे स्थान गाठले. यासह त्याने भारतीय संघाला कांस्यपदक मिळवून दिले. भारताचे या गटातील हे तिसरे पदक ठरले.   


राेहित-भगवानला कांस्यपदक
भारतीय संघाच्या सांघिक गटातील साेनेरी यशाने राेव्हरचा अात्मविश्वास द्विगुणीत झाला. यातूनच राेहित कुमार अाणि भगवानचा उत्साह वाढला. त्यांनी राेइंगच्या डबल्स स्कल्सच्या गटात साेनेरी यशाचा पल्ला गाठण्याचा प्रय्तन केला. मात्र, भारताची झेप तिसऱ्या स्थानावर राहिली. त्यांनी या गटाचे अंंतर ७ मिनिटे ४.६१ सेकंदांत गाठले. यासह भारताचे हे दाेघेही दुहेरीत कांस्यपदकाचे मानकरी ठरले. यासह त्यांनी भारताच्या नावे पदक केले.  


Loading...

Recommended


Loading...