Loading...

OMG: 500 वर्षांपूर्वी बर्फात गोठली होती ही तरुणी; ब्लेड लावताच निघाले रक्त, केसांतील उवा अजुनही जिवंत

500 वर्षे बर्फाखाली दबलेली असतानाही ही ममी जिवंत असल्याचा भास झाला होता. तिच्या केसांमध्ये उवा सुद्धा तशाच होत्या.

Divya Marathi Sep 10, 2018, 00:01 IST

न्यूयॉर्क - गेल्या 500 वर्षांपासून बर्फात गोठलेल्या एका मुलीच्या बॉडीतून प्रथमच एका आजाराचा पत्ता लागला आहे. इंका आदिवासी समुदायाची असलेल्या या मुलीच्या तपासात ती मरताना जिवाणूंच्या संक्रमणाला सामोरे जात होती असे समोर आले आहे. या बॅक्टेरियाची लक्षणे हुबेहूब टीबी प्रमाणेच आहेत. ही ममी इतक्या चांगल्या कंडिशनमध्ये सापडली होती, की ती 500 वर्षे जुनी असल्याचे कुणालाही वाटत नव्हते. तपासासाठी जेव्हा डॉक्टरांनी तिच्या त्वचेवर ब्लेड लावला तेव्हा त्यातून रक्त बाहेर आले. या मुलीच्या रक्ताचे आणि बॅक्टेरियाचे नमुने घेऊन आधुनिक रोगांवर उपचार केले जाऊ शकतील असा दावा डॉक्टरांनी केला आहे.


फुफुसांमध्ये संक्रमणाचे अवशेष
न्यूयॉर्कच्या शहर विद्यापीठात क्रिमिनल जस्टिस कॉलेजचे रिसर्चर अँजेलिक कोर्थल्स यांनी सांगितल्याप्रमाणे, ही ममी अतिशय चांगल्या प्रकारे साठवण्यात आली होती. टीमने दोन इंका आदिवासी ममींचे ओठ स्वच्छ केले आणि त्यातील प्रोटीनची तुलना केली. त्यातून या ममीला श्वसनाचा त्रास होता असेही समोर आले. सोबतच, तिच्या रक्ताचे नमुने आणि फुफुसांचा तपास केला असात तिच्या फुफुसांमध्ये संक्रमण असल्याचे समजले आहे. 1918 मध्ये आलेला फ्लू आणि आताच्या संसर्गजन्य रोगांचा अभ्यास करण्यासाठी ही ममी उपयुक्त आहे.


केसांमध्ये उवा, कापताच रक्त निघाले...
ही ममी अर्जेंटीनाच्या एका ज्वालामुखीच्या ढिगारातून 1999 मध्ये बाहेर काढण्यात आली आहे. ही जागा समुद्र सपाटीपासून 22 हजार फुट उंच आहे. अमेरिकेच्या पुरातत्व आणि एक्पेडिशन मेंबर जोहान रेनहर्ड यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनीच ही ममी सर्वप्रथम पाहिली होती. 500 वर्षे बर्फाखाली दबलेली असतानाही ही ममी जिवंत असल्याचा भास झाला होता. तिच्या केसांमध्ये उवा सुद्धा तशाच होत्या. काही तज्ञांच्या मते, तिचा अनिष्ठ प्रथेसाठी बळी देण्यात आला असावा.


Loading...

Recommended


Loading...