इंटरनॅशनल डेस्क - स्कॉटलंडच्या जॅस्मिन व्लासी या तरुणीला एका वेगळ्याच अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तिच्या शरीराच्या एका भागाची वाढ साधारणपणे तिच्या शरिराच्या तुलनेत जास्त होत आहे. तिच्या शरिराचा हा भाग म्हणजे तिचे ब्रेस्ट. ब्रेस्टच्या होणाऱ्या वाढीमुळे तिला त्रासाला सामोरे जावे लागले. त्यावर डॉक्टरांनी सर्जरी करण्यास सांगितले. पण सर्जरीसाठी जास्त पैसे लागणार होते. तिच्याकडे पैसे नसल्याने तिने थेट फेसबूकद्वारे पैसे जमवण्याचा निर्णय घेतला.
जन्मापासून अत्यंत सुंदर असलेल्या जॅस्मिनचे बालपण चांगले गेले. सुरुवातील सर्वकाही ठिक होते. पण जसजशी ती किशोरवयात येऊ लागली तिला तिच्या शरिराच्या एका अवयवाची वाढ जास्त होत असल्याचे लक्षात यायला लागले. हळू हळू त्याची वाढ एवढी जास्त झाली की, जॅस्मिनला हा पार्टच नकोसा झाला. हा पार्ट म्हणजे ब्रेस्ट. डॉक्टरांनी यावर उपाय म्हणून जॅस्मिनला ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीचा उपाय सांगितला. पण त्यासाठी प्रचंड पैसा लागणार होता आणि जॅस्मिनकडे पैसे नव्हते. त्यामुळे क्राऊड फंडींगच्या माध्यमातून पैसा उभा करण्याचा निर्णय तिने घेतला. फेसबूकच्या माध्यमातून तिने थेट लोकांसमोर तिची अडचण मांडली आणि आर्थिक मदतीची मागणी केली. त्याचा फायदाही झाला. जॅस्मिनने आतापर्यंत तिला हव्या असलेल्या रकमेपैकी जवळपास 60 टक्के रक्कम जमवली आहे.
लोकांनी दिल्या धमक्या
जॅस्मिनला चांगला प्रतिसाद मिळाली आणि तिला लोकांकडून मदतही मिळू लागली. पण याचबरोबर एक अनपेक्षित प्रकारही घडला. सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काही लोकांनी जॅस्मिनला धमक्याही दिल्या. काही दिवसांनी तर जॅस्मिनने या प्रतिक्रिया वाचणेच बंद केले असे सांगितले. पण तरीही यापेक्षा मदत करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे समाधान आहे असे जॅस्मिनचे म्हणणे आहे.