Loading...

बिझनेसमन आनंद महेंद्रा यांनी एका मासेमारी करणा-याला गिफ्ट केली 10 लाखांची कार, यामागचे कारण ऐकून लोकांनी केले सॅल्युट

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कंपनीची नवीन लाँच झालेली 'मराजो' ही कार केपींनी भेट म्हणून दिली आहे.

Divya Marathi Sep 12, 2018, 12:48 IST

नॅशनल डेस्क/ कोच्चि: अलीकडेच केरळमधील लोकांना भीषण पूराचा सामना करावा लागला. याकाळात अनेकांनी निस्वार्थपणे अडचणीत सापडलेल्या लोकांची मदत केली. यापैकीच एक आहेत जैसल केपी. जैसल हे मासेमारी करतात. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पुरग्रस्तांना वाचवणा-या जवानांची मदत केली होती. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कंपनीची नवीन लाँच झालेली 'मराजो' ही कार केपींनी भेट म्हणून दिली आहे. 

 

केपी यांनी काय केले होते?
केपी यांनी केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर पाण्यात सीढी बनवून महिला आणि मुलांना नावेपर्यंत पोहोचवले होते. आनंद महेंद्रा यांनी केपी यांना कारची चावी भेट देतानाचा फोटो ट्वीट केला आहे. कालीकटमध्ये केरळचे श्रम मंत्री टीपी रामाकृष्णन यांनी केपी यांना 10 लाख रुपये किंमतीच्या कारची चावी 

सुपूर्त केली.  


Loading...

Recommended


Loading...