Loading...

‘भास्कर’च्या मोहिमेत सहभागी होत तरुणांनी मातीपासून तयार केली दूध विक्रेता गणेशमूर्ती

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुजरातमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी ‘भास्कर’च्या वतीने ‘मातीचे गणेश’ मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Divya Marathi Sep 11, 2018, 09:31 IST

धरमपूर- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुजरातमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी ‘भास्कर’च्या वतीने ‘मातीचे गणेश’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेस सुरुवातीपासूनच धरमपूरच्या जय ठाकर ग्रुपच्या तरुणांनी पाठिंबा दिला. त्यांनी मातीची गणपतीची मूर्ती तयार केली. या तरुणांनी तीन दरवाजा परिसरातील मातीच्या गणपतीची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुरतमध्ये मातीची मूर्ती तयार करून घेतली. 


येथील गोपालनाचा प्रमुख व्यवसाय असलेल्या अहिर समाजाच्या वतीने दुधाची कॅन घेऊन बुलेटवर स्वार झालेले गणपती पारंपरिक गवळ्याच्या वेशात दिसत आहेत. ही मूर्ती खूपच आकर्षक व मनमोहक अशी आहे. अहिर समाजातील तरुणांनी भास्करच्या मोिहमेपासून प्रेरणा घेतली. यात अहिर समाजाचे तरुण कीर्ती जीवा, जगदीश, दीपेन अहिर व किरण राठोडसह अन्य तरुणांचा सहभाग आहे. त्यांनी गेल्या वर्षीही मातीचीच मूर्ती बसवली होती. 


या मंडळांचाही पाठिंबा
सामाजिक कार्यकर्ते कीर्ती राठोड ग्रुप यांच्यासोबतच वालोड फलिया येथील आयडियल ग्रुप, देवर्षी भरुचा, स्वप्निल देसाई यांनीसुद्धा भास्कर मोहिमेत सहभागी होत मातीच्या गणपतीची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वालोड फलिया येथेही मातीचेच गणपती बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


Loading...

Recommended


Loading...