Loading...

सलमान आपल्‍या घरी केव्हापासून करतात गणेशाची स्‍थापना, वाचा खास माहिती

देशभर धूमधडाक्‍यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यात बॉलीवूड सेलेब्ससुद्धा आघाडीवर आहेत.

Divya Marathi Sep 14, 2018, 12:40 IST

मुंबई - देशभर धूमधडाक्‍यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यात बॉलीवूड सेलेब्ससुद्धा आघाडीवर आहेत. आपल्‍या व्‍यस्‍त वेळापत्रकातून अनेक बॉलिवूड कलाकार श्री गणेशाची स्‍थापना करतात. यात सलमान खानचाही समावेश आहे. मात्र गेल्या वर्षी सलमानने आपल्या घरी बाप्पा न बसवता आपली बहीण अर्पिता खानच्या घरी बाप्पांची स्थापना केली होती. सलमान आपल्‍या घरी 'श्रीं'ची आराधना केव्‍हापासून करत आहे, याची खासी माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...


बहीण अर्पितामुळे गणेशोत्‍सव
सलमानच्‍या घरात (गॅलेक्सी अपार्टमेंट) एक मंदिर आहे. याच ठिकाणी दरवर्षी त्‍याचे कुटुंबीय गणेशाची स्‍थापना करते. सलमानने सांगितले, अनेक वर्षांपासून आम्‍ही मनोभावे गणेशाची स्‍थापना करतो. माझी बहीण अर्पितामुळे त्‍याची सुरुवात झाली. आपणही इतरांप्रमाणे घरात गणपती मांडवा, असे अर्पिताला वाटत होते. तिच्‍या इच्‍छापूर्तीसाठी आम्‍ही पहिल्‍यांदा घरी गणपती आणला होता. 


सलमान गणेशाचा भक्‍त... 
सलमान म्‍हणाला, माझी गणेशावर खूप श्रद्धा आहे. मी स्‍वत:ला गणपतीचा स्‍पेशल भक्‍त मानतो. मागील काही वर्षांत माझ्यावर अनेक संकटं आलीत. पण, त्‍यातूनही मी सहीसलमात सुटलो ते त्‍याच्‍यामुळेच.


पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर स्टार्स कसे करतात गणपती पूजन.


Loading...

Recommended


Loading...