Loading...

Pak चे माजी पंतप्रधान नवाज शरीफांना पत्नीशोक; कुलसूम बेगम यांचे घशाच्या कर्करोगाने लंडनमध्ये निधन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसूम शरीफ यांचे मंगळवारी लंडनमध्ये निधन झाले.

Divya Marathi Sep 12, 2018, 09:33 IST

लंडन- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पत्नी कुलसुम यांचे प्रदीर्घ आजारानंतर मंगळवारी लंडनमध्ये निधन झाले. त्या घशाच्या कर्कराेगाशी अनेक महिन्यांपासून संघर्ष करत होत्या. त्यात ६८ वर्षांच्या होत्या. लंडनच्या हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये त्यांच्यावर जून २०१४ पासून उपचार सुरू होते. 


कुलसुम यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री अचानक त्यांच्या फुप्फुसाच्या कार्यात बिघाड झाली. त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले. शरीफ यांचे बंधू व पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी कुलसुम यांच्या निधनाच्या वृत्तास ट्विटद्वारे दुजोरा दिला. त्यांच्या पश्चात पती नवाझ, मुलगे- हसन, हुसेन, मुली-मरयम, अस्मा असा परिवार आहे. 


जुलै महिन्यात पाकिस्तान न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणात माजी पंतप्रधान शरीफ व मोहंमद सफदर यांना दोषी ठरवले होते. या प्रकरणात दोघेही रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. 

 

गतवर्षीच लागला कर्करोग असल्याचा पत्ता

नवाज शरीफ आणि कुलसूम यांचा विवाह एप्रिल 1971 मध्ये झाला होता. गेल्या 4 वर्षांपासून त्यांच्या घशावर लंडनच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या चाचण्यांमध्ये त्यांना घशाचा कर्करोग असल्याचे समोर आले होते. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती आणखी खालावली. कुलसूम शरीफ 68 वर्षांच्या होत्या.


Loading...

Recommended


Loading...