Loading...

एम. करुणानिधी यांची प्रकृती चिंताजनक; वृत्त कळताच रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख ९५ वर्षीय एम. करुणानिधी यांची प्रकृती सोमवारी अत्यंत खालावली.

Divya Marathi Aug 07, 2018, 05:46 IST

चेन्नई- तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख ९५ वर्षीय एम. करुणानिधी यांची प्रकृती सोमवारी अत्यंत खालावली. कावेरी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, पुढील २४ तास त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मेडिकल बुलेटिननुसार, वार्धक्यासंबंधित अाजार पाहता त्यांच्या अवयवांना सातत्याने काम करत ठेवणे हे मोठे आव्हान आहे. 


करुणानिधी तामिळनाडूत ५ वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांची प्रकृतीचे वृत्त कळताच रुग्णालयाबाहेर समर्थक जमा झाले. करुणानिधी यांची पत्नी दयालूअम्माही व्हीलचेअरवरून रुग्णालयात आल्या. २८ जुलैला करुणानिधी हे रुग्णालयात दाखल झाल्यापासून ही त्यांची पहिलीच भेट आहे.


Loading...

Recommended


Loading...