Loading...

जेटलींचे स्पष्टीकरण : 'माल्ल्या खोटारडा.. संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण मी ऐकूणच घेतले नाही'

एकदा त्याने संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला पण आपण ऐकूणच घेतले नसल्याचे जेटली म्हणाले.

Divya Marathi Sep 12, 2018, 19:24 IST

नवी दिल्ली - देश सोडण्यापूर्वी अरुण जेटलींना भेटल्याचे वक्तव्य करत विजय माल्ल्याने एकच खळबळ उडवून दिली आहे. पण अरुण जेटलींनी तातडीने या प्रकरणी त्यांचे स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे. माल्ल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे जेटली म्हणाले. 2014 पासून माल्ल्याला भेटण्यासाठी वेळच दिली नाही. उलट एकदा त्याने संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला पण आपण ऐकूणच घेतले नसल्याचे जेटली म्हणाले. 


काय म्हणाले जेटली..  
- 2014 पासून मी माल्ल्याला भेटण्यासाठी वेळच दिली नाही, त्यामुळे त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 
- राज्यसभेचे खासदार असल्याने माल्ल्या सभागृहात येत होते. अशाच एका दिवशी त्यांनी पदाचा गैरफायदा घेत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता.
- मी सभागृहातून माझ्या खोलीत जात होतो. त्याचवेळी माल्ल्या वेगाने माझ्याकडे चालत आले. चालतानाच ते 'मी सेटलमेंटची ऑफर दिली आहे' असे एक वाक्य बोलले. 
- मला त्यांच्या फसव्या ऑफरची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे मी त्यांना पुढे बोलू न देता स्पष्ट सांगितले, याबाबत माझ्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही बँकांना या ऑफर द्या. एवढे बोलून मी निघून गेलो. माल्ल्याच्या हातातील पेपरही मी घेतले नाहीत. 
- या एका वाक्याशिवाय आमच्यामध्ये काहीही बोलणे झाले नाही. तेही त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा गैरवापर करून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता.  

 

पुढे पाहा, जेटलींनी जाहीर केलेले पत्र..


Loading...

Recommended


Loading...