Loading...

गाढ झोपेत होता 5 वर्षांचा मुलगा, अचानक बेडवर आला 10 फुट लांब कोब्रा, कुटुंबीयांनी बघितले असता मुलाच्या तोंडून निघत होता फेस...

ओल्ड पंचकूलामध्ये सापाने चावा घेतल्याने एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Divya Marathi Sep 12, 2018, 13:14 IST

पंचकुला (चंडीगड) : ओल्ड पंचकूलामध्ये सापाने चावा घेतल्याने एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आर्य ओल्ड पंचकुलास्थित आपल्या घरी रात्री झोपला होता. रात्री झोपेतच त्याच्या डोक्याचा सापने चावा घेतला. रात्रीच्या वेळी कुटुंबीयांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही. सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी आर्यला बघितले तेव्हा त्याच्या तोंडून फेस निघत होता.  

 

तत्काळ घेऊन गेले डॉक्टरांकडे... 

आर्यला त्याचे आईवडील तत्काळ सेक्टर 6 स्थित एका रुग्णालयात घेऊन गेले असता, त्याला सापाने चावल्याचे डॉक्टांनी सांगितले. मुलाची प्रकृती गंभीर होती. त्याला पीजीआयमध्ये पाठवण्यात आले. आर्यवर मंगळवारी दिवसभर पीजीआयमध्ये उपचार झाले, पण संध्याकाळी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

 

पंचकुला महानगरच्या टीमने मंगळवारी सेक्टर-19 मधून कोब्राला पकडले...

सोमवारी सूरजपूरच्या फॅक्ट्रीतून महानगर पालिकेच्या लोकांनी कोब्राला पकडले होते. त्यांना सेक्टर 19मधून एका घरात साप असल्याची सूचना मिळाली होती.  कर्मचा-यांनी घटनास्थळी पोहोचून विषारी कोब्राला पकडले. त्यानंतर त्याला प्लास्टिकच्या एका डब्ब्यात बंद करुन जंगलात सोडले. महानगरपालिकेचे कमिश्नर राजेश जोगपाल यांनी सांगितले की, गेल्या महिन्याभरात एमसीच्या टीमने 9 साप पकडले. त्यापैकी तीन विषारी होती. यामध्ये  कोब्राव्यतिरिक्त करैत स्नेक आणि रसल वायपर जातीच्या सापांचा समावेश होता. 

 

घरात साप दिसल्यावर काय करावे... 

- जर साप विषारी असल्याचे तुम्हाला वाटले, तर वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट, स्नेक कॅचर्स किंवा जंगली जानवर पकडणा-यांना बोलवावे. सापांची पिल्लेही चावा घेतात. ते विषारी असू शकतात. त्यांना पकडण्यासाठी अनुभवी व्यक्तीची मदत घ्या. 

- सापाला एका खोलीत बंद करुन ठेवण्याचा प्रयत्न करा. जर साप तुम्हाला बाथरुममध्ये आढळला तर तत्काळ दार बंद करा आणि टॉवेलच्या मदतीने दाराची खालची फट बंद करा. जेणेकरुन साप बाहेर येऊ शकणार नाही.

- लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना साप असलेल्या ठिकाणापासून दूर न्या. 

- सापाला स्वतः पकडण्याचा प्रयत्न करु नका.  
- झाडूचा वापर करा जेणेकरुन सापाला पकडून तुम्ही त्याच्यावर प्लास्टिक शीट टाकू शकला.  
- सापावर कचराकुंडी किंवा एखाद डब्बा ठेवा. 
- सापाला जंगल किंवा घरापासून दूर अंतरावर सोडा. 
- साप येऊ नये, यासाठी घराजवळील गवत नित्यनियमाने साफ करत राहा. कारण लांब गवत आणि जंगली झाडे सापांच्या लपण्याचे उत्तम ठिकाण असते.  

- घरात कीडे- माकोडे, कॉकरोच, होऊ देऊ नका. साप त्यांना खाण्यासाठी अनेकदा घरात शिरत असतात. 

- सापाला घरात शिरु न देण्यासाठी घराच्या दार खिडक्या चांगल्याप्रकारे सील करा. 
- अमोनियामध्ये भिजलेला कपडा ठेवा. यामुळे विविध प्राणी घराजवळ येत नाहीत. हा कापडाचा तुकडा अशा ठिकाणी ठेवा, जिथे पहिले सापाला बघितले होते. 

 

सप्टेंबरमध्ये थंडी वाढल्याने साप शोधत असतात गरम ठिकाण 
स्नेक कॅचर सलीम खान यांनी सांगितल्यानुसार, सप्टेंबर महिन्यात थंडी वाढू लागते. त्यामुळे साप त्यांच्यासाठी गरम ठिकाणाचा शोध घेत असतात. त्यांनी सांगितल्यानुसार, मंगळवारी पंचकुलाच्या सेक्टर 21 आणि बद्दी येथे त्यांनी रात्रीच्या वेळी गर्मीसाठी रस्त्यावर निघालेले अनेक साप गाड्यांच्या खाली आले होते. ऑक्टोबरमध्ये साप गर्मीसाठी दुपारी पार्क किंवा मातीच्या ढिगा-याजवळ येत असतात. सापांना घाबरु नका. त्यांच्यावर नजर ठेऊन स्नेक कॅचरला बोलवा. जर तुम्ही खोलीच्या दारात उभे झाले, तर साप खोलीबाहेर निघत नाही. जर तुम्ही खोली सोडली तर साप कुठेही शिरु शकतो. त्यामुळे त्याला शोधणे कठीण जाते. बीनच्या साहाय्याने सापाला बोलावता येत नाही कारण सापांना कान नसतात.  


Loading...

Recommended


Loading...