Loading...

घबरबसल्या आपणही करू शकता हे 5 Business; छंद जोपासताना मिळवा चांगली Income

आम्ही तुम्हाला 5 बिझनेस सांगत आहोत जे तुम्ही घरबसल्या करु शकता. याआधारे तुम्ही चांगले उत्पन्नही मिळवू शकता.

Divya Marathi Sep 07, 2018, 00:26 IST

युटिलिटी डेस्क - बदलत्या गरजा आणि वेगाने बदलणारे तंत्रज्ञान यामुळे तुम्हाला व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. यातील काही संधी तर तुम्हाला घरबसल्या उत्पन्न मिळवून देऊ शकतात. यासाठी तुम्हाला थोडी जागा लागेल आणि गुंतवणूकही फारशी नसेल. खूप गुंतवणूक नसल्याने यात तुमचे पैसे बुडण्याची शक्यताही फार कमी असते. आम्ही तुम्हाला 5 बिझनेस सांगत आहोत जे तुम्ही घरबसल्या करु शकता. याआधारे तुम्ही चांगले उत्पन्नही मिळवू शकता.


1. डे केअर सेंटर
शहरातील बदलत्या लाईफस्टाईलचा विचार केल्यास तुमच्या लक्षात येईल की डे केअर सेंटर आणि क्रेचही मागणी वाढत आहे. तुम्ही हा व्यवसाय एक किंवा दोन खोल्यांमध्ये करु शकता. यासाठी छोटया मुलींची खेळणी आणि त्यांच्या खाण्याची व्यवस्था मात्र चांगली करावी लागते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किती वर्षाच्या मुलांना सांभाळू शकता याचा निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही यासाठी दरमहा दीड ते अडीच हजार रुपये आकारु शकता.


2. होम जिम
गरज नाही की तुम्ही जिम मोठ्या जागेतच सुरु करावी. तुम्ही कमी जागेतही योग्य आखणी करुन जिम सुरु करु शकता. अशा जिम लोकप्रियही होतात. विशेषत: महिला वर्गामध्ये अशा जिम लोकप्रिय आहेत. याठिकाणी तुम्ही खूप महागडया आणि मोठ्या आकाराच्या मशीन ठेवण्याची गरज नसते. या जिम महिलांना थोडा वर्कआऊट आणि आउटिंग करण्यास मदत करतात. तेथे अशाही महिला येतात ज्यांना थोड्या प्रमाणातच व्यायाम करायचा असतो. केवळ एक लाख रुपये गुंतवणूक करुन तुम्ही अनेक उपकरणे घेऊ शकता. याची रनिंग कॉस्टही खूपच कमी असते.


3. मशरुमची शेती
तुमच्याकडे एखादी खोली रिकामी पडलेली असेल तर तुम्ही मशरुमची शेती करु शकता. त्या खोली प्रकाश येऊ नये. ही खोली तुमच्या लिविंग रुमपासून दुर असावी. मशरुम शेतीतून होणारे फायदे लक्षात आल्याने आता अनेक मोठ्या शहरातील युवकही या उद्योगाकडे वळाले आहेत. अनेक जण वेगवेगळ्या पध्दतीने ही शेती करत आहेत. ओएस्टर मशरुमच्या शेतीत एकुण खर्चाच्या तीनपट जास्त उत्पन्न मिळत आहे. हे मशरुम तयार होण्यासाठी 2 ते 3 महिने लागतात.


4. ब्लॉग
घरबसल्या कमाई करण्याचा आणखी एक मार्ग आहे तो म्हणजे ब्लॉगिंग. तुम्ही अनेक विषयांवर ब्लॉग लिहू शकता. अनेक जण याद्वारे चांगली कमाई करत आहेत. ब्लॉगिंग हे खरेतर एखादी वेबसाईट चालविण्यासारखेच आहे. तुम्ही गूगल वर्ल्ड प्रेसवर जाऊन ब्लॉग लिहू शकता. तुमच्या ब्लॉगला चांगला वाचकवर्ग मिळाला तर तुम्हाला जाहिरातीही मिळू लागतात. असे काही ब्लॉगर आहेत जे महिन्याला लाखो रुपये कमावतात.


5. हॉबी क्‍लासेस
तुम्हाला जर पेटिंग, गिटार वाजवण्यासारखी आवड असेल तर तुम्ही दुसऱ्याला तुमच्याकडे असलेली कला शिकवून पैसे कमावू शकता. अशा रितीने काही जण महिना 25 हजार रुपये कमावत आहेत. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही आठवड्याला तीन ते चार वेळा शिकवूनही हा क्लास चालवू शकता. यासाठी तुम्ही दरमहा साधारणपणे एक हजार रुपये शुल्क आकारु शकता.


Loading...

Recommended


Loading...