Loading...

किशोर-मिथुन, विवेक-सलमान गर्लफ्रेंडमुळे या अभिनेत्यांमध्ये झाले भांडण

4 ऑगस्टला मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील गांगुली कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला होता.

Divya Marathi Aug 04, 2018, 00:00 IST

एन्टटेन्मेंट डेस्क: 4 ऑगस्टला मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील गांगुली कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला होता. त्याचे नाव होते आभास कुमार गांगुली. मात्र प्रेमाने त्याला गंगोपाध्याय म्हणून हाक मारली जात होती. मात्र हा मुलगा जेव्हा मोठा झाला, तेव्हा त्याचे नाव आभास कुमारहून किशोर कुमार असे झाले.


आम्ही बोलतोय ते भारतीय सिनेसृष्टीत सदाबहार अभिनेते किशोर कुमार यांच्याबद्दल. आपल्या गायन आणि अभिनय कौशल्याच्या बळावर किशोर कुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पार्श्वगायक आणि अभिनेत्याबरोबरच किशोर कुमार दिग्दर्शक, निर्माता आणि स्क्रिप्ट रायटरसुद्धा होते.
आज (4 ऑगस्ट) किशोर दांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या वयक्ति आयुष्याविषयी काही गोष्टी सांगणार आहोत. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते असे आहेत, ज्यांच्यामध्ये गर्लफ्रेंडमुळे भांडण होतात. किशोर कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यामध्येही असेच भांडण झाले होते. 


किशोर कुमार आणि मिखुन चक्रवर्ती-
हिंदी सिनेमांचे सर्वात टॅलेंटेड गायकांमधील एक किशोर कुमार आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यात सुध्दा अभिनेत्री योगिता बालीसाठी वाद झाला होता. योगिता किशोर कुमार यांची पत्नी होती. परंतु 1982मध्ये त्यांनी किशोर यांना सोडून मिथुन चक्रवर्तीसोबत केले होते. त्यामुळे नाराज झालेल्या किशोर यांनी मिथुनसाठी गाणी गाण्यास सोडून दिले होते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या अशाच काही अभिनेत्यांविषयी...

 


Loading...

Recommended


Loading...