Loading...

बाइक घेऊन सासरवाडीत पोहोचला Husband, आनंदाने उड्या मारत होती Wife; अचानक चापट मारून छोटी म्हणाली 'भाऊजी' तुला नाही मला घ्यायला आले!

अनैतिक संबंध असतानाही हे दोघे नातेवाइकांमध्ये भाऊ-बहिण सारखे वागण्याचे नाटक करत होते.

Divya Marathi Sep 09, 2018, 12:17 IST

अहमदाबाद - शहरात एका विवाहितेने आपल्या पती आणि सख्ख्या बहिणीवर गंभीर आरोप लावले आहेत. तिने सांगितल्याप्रमाणे, तिचा पती आणि बहिण यांच्यात 9 वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. अनैतिक संबंध असतानाही हे दोघे नातेवाइकांमध्ये भाऊ-बहिण सारखे वागण्याचे नाटक करत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून पीडितेची बहिण आपल्या भाऊजीला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायची. यानंतर घरी कुणीही नसताना ते दोघे पती आणि पत्नीसारखे राहत होते. गेल्या महिन्यातच मेहुणी आणि भाऊजीने गुपचूप लग्न देखील केले आहे. 

 

9 वर्षांपूर्वी झाला होता विवाह...
> अहमदाबादच्या के. के. नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह 9 वर्षांपूर्वी एका उद्योजकाच्या मुलासोबत झाला होता. लग्नात मुलीच्या वडिलांनी नवरदेवाला 10 लाखांचा हुंडा दिला होता. या दोघांना एक मुलगा देखील झाला. परंतु, काही दिवसांतच दोघांमध्ये भांडण आणि वाद वाढले. नेहमीच होणाऱ्या भांडणांना कंटाळून पत्नी पतीला सोडून माहेरी आली होती. आपल्या पतीला समज येईल आणि तो आवश्य आपल्याला घेऊन जाण्यासाठी येईल या अपेक्षेने ती बसली होती. मग, 18 ऑगस्ट रोजी पती आपल्या सासरवडीत बाइक घेऊन पोहोचला. परंतु, यानंतर जे घडले ते पाहून महिलेच्या पायाखालची जमीनच घसरली. 
> पती आपल्या माहेरी आल्याचे पाहून पत्नी इतकी खुश झाली की ती आनंदाने उड्या मारत होती. आपला पती आता सुधरला असून घेण्यासाठीच आला असे तिला वाटत होते. घरी तिच्या छोट्या बहिणीशिवाय दुसरे कुणीच नव्हते. आपल्या मोठ्या बहिणीला आनंदात पाहून छोटीला राग आला आणि तिने संतापात तिच्या कानाखाली चापट लावला. यानंतर छोटी म्हणाली, की भाऊजी तुझ्यासाठी नव्हे, तर मला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. आता मी त्यांच्यासोबत जात आहे. 


पती विरोधात धोका, मारहाणीचा आरोप
पीडित पत्नीने लावलेल्या आरोपानुसार, तिचा पती आपल्या आई-वडिलांसमोरच तिला बेदम मारहाण करत होता. छोट्याशा गोष्टीवर झालेल्या वादानंतर तो तिला दारु पिऊन मारहाण करायचा. तिच्या पतीला शेअर मार्केटमध्ये जुगार खेळण्याची सवय लागली होती. परंतु, नेहमीच होणाऱ्या घाट्यामुळे त्याला दारुचे व्यसन लागले होते. नेहमीच मारहाण करून तो सासऱ्यांकडून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत होता. एका मुलाला जन्म दिल्यानंतर ती पुन्हा गर्भवती झाली. परंतु, तिच्या पतीने बळजबरी तिचा गर्भपात केला. यानंतरही सतत 6 लाख रुपयांची मागणी करून तो तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता.

 


Loading...

Recommended


Loading...