Loading...

बसमध्ये प्रवाशाला उभे ठेवून नेता येत नाही, जाणून घ्या आपले 7 अधिकार

जर कोणत्याही प्रवाशाकडून किराया घेण्यात आला असेल तर त्याला बसमध्ये सीट देणे गरजेचे आहे.

Divya Marathi Sep 01, 2018, 00:02 IST

युटिलिटी डेस्क - जर कोणत्याही प्रवाशाकडून किराया घेण्यात आला असेल तर त्याला बसमध्ये सीट देणे गरजेचे आहे. जर एखाद्याला किराया देऊनही सीट दिली गेली नसेल तर प्रवासी त्याची तक्रार करू शकतो. आरटीओ जितेंद्रसिंह रघुवंशी (इंदूर) म्हणाले की, केंद्रीय मोटारवाहन नियमांतर्गत जास्तीत जास्त 12 प्रवाशांना उभे राहून बसमध्ये नेले जाऊ शकते. परंतु बस संचालकाला यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागते. जर ही परवानगी संचालकाकडे नसेल तर त्याला प्रवाशाला सीट द्यावीच लागेल. असे न केल्यास प्रवासी स्टेट ट्रान्सपोर्ट कमिश्नर तसेच क्षेत्रीय ट्रान्सपोर्ट अधिकारी यांना तक्रार करू शकतो.

 

> येथेही तक्रारीचे निराकरण झाले नाही तर ग्राहक मंचात तक्रार करता येते. अशा वेळी संबंधित बस संचालकाला प्रवाशाला भरपाई द्यावी लागू शकते. 

 

अपघात झाल्यावरही असतो भरपाईचा हक्क
> जर एखादा प्रवासी सार्वजनिक सेवेच्या वाहनात प्रवास करत असेल आणि ड्रायव्हरच्या चुकीमुळे तो अपघातग्रस्त झाला तर याप्रकरणी संबंधित प्रवासी भरपाईसाठी दावा दाखल करू शकतो. गुजरात हायकोर्टाने या प्रकारच्या प्रकरणात आदेश दिलेले आहेत.

> गुजरात स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (GSRTC)च्या बसमध्ये अरविंद मेहता नामक प्रवासी अपघातग्रस्त झाला होता. त्यांनी भरपाईसाठी कोर्टात अपील केले. यानंतर मोटर दुर्घटना दावा ट्रिब्यूनल (MACT)ने GSRTC ला मेहता यांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

> निवृत्त एएसपी (ट्रॅफिक) आर.एस. राणावत म्हणाले की, बससंचालक ज्या सुविधा देण्याचे आश्वासन देतो, त्या त्याने प्रवाशांना देणे गरजेचे आहे. न दिल्याने अनेक प्रवासी ग्राहक मंचात गेले आणि त्यांना तेथून न्याय मिळाला आहे. आज आम्ही सांगत आहोत की, बसमध्ये प्रवाशांना कोणते अधिकार मिळतात.

 

प्रत्येक प्रवाशाला बसमध्ये असतात हे अधिकार, जाणून घ्या पुढच्या स्लाइड्सवर... 


Loading...

Recommended


Loading...