Loading...

शताब्दीचे इंजिन डब्यांशिवाय ५० फूट धावले, पुणे विभागातील केडगावजवळची घटना

गुरुवारी पुण्याहून सिकंदराबाद जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन आणि डबे यांना जोडणारी कपलिंग तुटली. कपलिंग तुटल्याने ड

Divya Marathi Sep 07, 2018, 10:21 IST

सोलापूर- गुरुवारी पुण्याहून सिकंदराबाद जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन आणि डबे यांना जोडणारी कपलिंग तुटली. कपलिंग तुटल्याने डब्यांना पाठीमागे सोडून जवळपास १५ मीटर इंजिन धावले. चालकाला डबे पाठीमागे राहिल्याचे लक्षात आल्यानंतर इंजिन पुन्हा मागे घेण्यात अाले. मात्र कपलिंग जोडून पुन्हा रेल्वे धावण्यासाठी किमान दीड तासाचा विलंब झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास केडगाव स्थानकाजवळ घडली. पुणे विभागाने याची गंभीर दखल घेत या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहे. 


शताब्दी एक्स्प्रेसला सेंटर बफर कपलिंगची पद्धत आहे. हे कपलिंग व्यवस्थित बसण्यासाठी इंजिन ५ किमीच्या वेगाने आणून डब्यांना जोडणारी कपलिंग जोडावी लागते. गुरुवारी बहुदा असे घडले नाही. पॉइंटसमनने जोडलेले कपलिंग लागलीच निघाले. यामुळे कोणता अपघात जरी घडला नाही तरी असे प्रकार गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे विभागाने या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहे. 


Loading...

Recommended


Loading...